शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

"मनातल्या गोष्टी" व "वासुदेवाय नमः" एकांकिका कट्ट्यावर सादर:प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 4:05 PM

गेली अनेक वर्ष सातत्याने वेगवेगळे नाट्य प्रयोग करणाऱ्या अभिनय कट्ट्यावर एकांकिका पाहण्यासाठी रसिकांची गर्दी झाली होती.

ठळक मुद्दे"मनातल्या गोष्टी" व "वासुदेवाय नमः" एकांकिका कट्ट्यावर सादर:प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादएकांकिका फक्त स्पर्धेपूरत्याच मर्यादित न राहता सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचाव्यात : किरण नाकती

ठाणेअभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी "मनातल्या गोष्टी" हि विनोदी एकांकिका आणि अमर हिंद मंडळ,दादर या संस्थेने "वासुदेवाय नमः" हि एकांकिका सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.यंदाचा हा ३८८ क्रमांकाचा कट्टा होता.

     तारुण्य हा आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ असतो.मैत्री करण्याचा,प्रेम करण्याचा,प्रेमात हरवण्याचा,मैत्रीसाठी वाट्टेल ते करण्याचा स्वतःची झालेली फजिती.तसेच मैत्रीच्या निरनिराळ्या गोष्टी,परिस्तिथी मूळे असफल झालेले प्रेम या एकांकिकेत लेखक,दिग्दर्शक अभिषेक जाधव याने मांडले.न्यूतन लंके,साक्षी महाडिक,कल्पेश डुकरे,शुभांगी गजरे,परेश दळवी,अभिषेक जाधव,सहदेव साळकर,शिवाणी देशमुख या कलाकरांनी या एकांकिकेत काम केले.ओंकार मराठे याने प्रकाशयोजना,सहदेव कोळंबकर याने संगीत केले होते. वासुदेवाय नमः हि एकांकिका वासुदेवाच्या आयुष्यावर भाष्य करणारी एकांकिका आहे.वासुदेवाच्या परंपरेवर समाजात कमी होत चाललेले स्थान.आणि हि परंपरा जपताना वासुदेवांचे होणारे हाल व डगमगलेली आर्थिक स्थिती आपल्याला पाहायला मिळते.यातूनच मुलांचे दुरावलेले शिक्षण आणि आणि आलेले आर्थिक दारिद्र्य आपल्याला या एकांकिकेत पाहायला मिळते. या एकांकिकेचे लेखन डॉ.माणिक वड्याळकार,दिगदर्शन गिरिष पांडे यांनी केले होते.प्रकाशयोजना संजय तोडणकर,संगीत समीर चव्हाण,नेपथ्य अमित सोळंकी यांनी केले होते.अश्वजीत फुले,अमित सोलंकी, ऐश्वर्या सक्रे,शुभम हिंदळेकर,विवेक बुरुंगुले,राहूल शिंदे,अभिषेक शेट्ये,आदित्य आंब्रे,गणेश गवारी,दानेश पाटील,मोहन आदलिंगे,हिमांशू वाईचोळ या काळाकरांनी या एकांकिकेत काम केले. या वेळी कट्ट्याचे निवेदन कदिर शेख याने केले.दीपप्रज्वलन शिला गोंधळेकर यांनी केले. एकांकिका या फक्त स्पर्धेपूरत्याच मर्यादित न राहता सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत त्या पोहचाव्यात या हेतूनेच आम्ही अभिनय कट्टा हि संकल्पना सुरु केली आहे.दिवसागणिक याचे वाढत जाणारे स्वरूप हि आनंदाची बाब आहे असे आयोजक किरण नाकती यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई