मालवणी मातीतली "मिरग" ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सादर, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 04:33 PM2018-07-30T16:33:03+5:302018-07-30T16:34:33+5:30

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर मिरग या एकांकिकेचे सादरीकरण झाले.

Spontaneous response from the audience, presented at the "Mirage" Thane in Malwani Mata | मालवणी मातीतली "मिरग" ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सादर, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवणी मातीतली "मिरग" ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सादर, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर मिरग एकांकिका सादर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादएकांकिकेच्या सर्वच कलाकारांचे स्वागत किरण नाकती यांनी केले

ठाणे : कल्याणच्या प्रयोजन या संस्थेच्या कलाकारांनी अभिनय कट्ट्यावर मिरग ही एकांकिका सादर करत रसिकांची मने जिंकली. या एकांकिकेचे लेखन नितिन परब आणि दिग्दर्शन आशुतोष जरे यांनी केले होते. यंदाचा हा ३८७ क्रंचा कट्टा होता.

   मालवणातील एका आबा नावाच्या व्यक्तीची ही कथा आहे.आबा हा गावातील एक प्रतिष्टीत व्यक्ती. आपण केवळ स्वतःचा विचार करून चालणार नाही,आपल्या सोबत आपलं गाव देखील आहे याचा आबा सतत विचार करत असे.एके दिवशी सरकारने गावातुन कोकण रेल्वे जाणार असा प्रस्ताव आणला असता,गावाच्या भल्यासाठी आबाने तो प्रस्ताव गावाला पटवून देऊन मान्य करायला लावला.याच दरम्यान कामाच्या गडबडीमुळे बायकोच्या अजारपणाकडे अबाचं दुर्लक्ष होतं आणि ती मरण पावते. याच रागापोटी आबाचा मुलगा मुंबई ला निघून जातो.आबा एकाकी पडतो या सगळ्याचा परिणाम आबावर होतो व तो गुरांमध्ये रमू लागतो.   असंच एकदा गुरं राखता राखता मिरगाच्या तोंडावर जोरदार पावसाची सुरवात होते.या पावसात सगळी गुरे घराकडे परततात पण अबाचा लाडका बैल घराकडे येत नाही.बैल वेळेत न आल्याने आबा अस्वस्थ होतो. या बैलाच्या शोधात आबा व त्याचा नोकर मधू एकमेकांना आणखी उलगडतात.पण बैल मात्र सापडत नाही.मुलगा जवळ नसल्याची व आबाला त्या विचारांच्या वेशात न जाऊ देण्याची मधूची तळमळ या नाटकात पहायला मिळते. मालवणच्या मातीतली हि कथा मनाला चटका लावून जाते.

   या एकांकिकेचे नेपथ्य-किशोर चंद, जगदीश पाटील, रंगभूषा- प्रगती भोसले,वेशभूषा- प्राची धावतरे,ऋत्विक निकाळे, रंगमंच व्यवस्था- अभिषेक चंद, विनय जोगळे, संगीत-नितिन परब,भूषण सदावर्ते यांनी केले. तसेच सूत्रधार राहुल डोमाडे यांनी केले.सुमती देशमुख यांच्या हस्ते कट्ट्याचे दीपप्रज्वलन करण्यात आले.कट्ट्याची सई कदम हिने बर्थडे सरप्राईज व परेश दळवी याने विचार ही एकपात्री सादर केली. तसेच सहदेव साळकर व कुंदन भोसले याने प्रवासात भेटलेली माणसं या द्वीपात्रीचे उत्कृष्ट सादरीकरण केले.कट्ट्याचे निवेदन सहदेव कोळंबकर याने केले.एकांकिकेच्या सर्वच कलाकारांचे स्वागत किरण नाकती यांनी केले.

Web Title: Spontaneous response from the audience, presented at the "Mirage" Thane in Malwani Mata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.