तलासरी : तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ए. मुल्ला यांची तलासरी येथून बदली करण्यात आली. येथे महामार्गावर रेतीमाफियांवर तसेच दापचरी तपासणी नाका येथून अवजड वाहने पास करणाऱ्या टोळ्यांवर पीएसआय ए. मुल्ला यांनी कारवाई करून अवैध धंदे करणाऱ्यांच्या उरात धडकी भरविली होती. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी तलासरी नाक्यावर उड्डाणपुलाखाली पीएसआय ए. मुल्ला यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. तेव्हापासून ते रजेवर होते. प्राणघातक हल्ल्याबाबत सखोल चौकशी करण्याची अनेकांनी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही याबाबत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात राजकारण्यांनी उडी मारल्याने याला वेगळे वळण लागले होते. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}