शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

वृद्धाला उडवून पसार झालेल्या बाइक स्टंटमॅनला अवघ्या दोन तासांमध्ये अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: April 21, 2019 22:27 IST

मोटारसायकलवर स्टंट करीत सुधाकर शिर्के या वृद्धाला उडवून पसार झालेल्या तनुज सावंत या मोटारसायकलस्वाराला वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये अटक केली.

ठळक मुद्देठाण्याच्या इटर्निटी मॉलजवळील घटना वागळे इस्टेट पोलिसांची कारवाईफेसबुकवरील फोटोच्या आधारे लागला तपास

ठाणे : वागळे इस्टेट, इटर्निटी मॉलच्या बसस्टॉपसमोरील रस्त्यावरून जाणाऱ्या धर्मा सुधाकर शिर्के (६८) या वृद्धाला उडवून पसार झालेल्या तनुज सावंत (२०, रा. नौपाडा, ठाणे) या स्टंटबाज मोटारसायकलस्वाराला वागळे इस्टेट पोलिसांनी सोशल मीडियाच्या आधारे अवघ्या दोन तासांमध्ये रविवारी अटक केली. त्याची मोटारसायकल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.इटर्निटी मॉलसमोरील बसथांब्यासमोरून शिर्के हे २० एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जात होते. त्यावेळी त्यांना तनुजने जोरदार धडक देऊन पलायन केले होते. त्याचवेळी तिथे गर्दी झाल्यामुळे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या शोध पथकाचे उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांच्या पथकाने तिथे चौकशी केली. तेव्हा, मोटारसायकलच्या धडकेमुळे शिर्के हे गंभीर जखमी झाल्याचे आढळले. त्यांच्या दोन्ही पायांची हाडे तुटल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना तातडीने आधी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात, नंतर कळवा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची गांभीर्यता पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोटे यांच्या पथकाने वागळे इस्टेट परिसरात स्टंटबाजी करत मोटारसायकल चालवणाऱ्यांची माहिती घेतली. सोशल मीडियाच्या (फेसबुक) आधाराने अनेकांची चौकशी केली. सखोल चौकशीअंती वागळे इस्टेट धर्मवीरनगर येथील मोटारसायकलस्वाराने यातील स्टंट करणाºया तरुणाला ओळखले. त्यानुसार, नौपाड्यातील जयानंद सोसायटीतून तनुज सावंत याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याने हा अपघात आपणाकडून झाला असून त्यानंतर आपण पलायन केल्याचीही कबुली दिली. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. अपघाताचा कोणताही सुगावा नसताना नवीन तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये अखेर सावंतला जेरबंद केले.सोशल मीडियावर फोटो करायचा अपलोडतनुज याला वेगवेगळ्या मोटारसायकलवर स्टंटबाजी करण्याची सवय आहे. स्टंटबाजी करताना फोटो काढून तो फेसबुकवर अपलोड करायचा. त्याचे असेच काही फोटो तपास पथकाच्या हाती लागले. मोटारसायकली मात्र वेगवेगळ्या होत्या. याच फोटोंच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात