शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसवरून ठाकरे गट अन् भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

By अजित मांडके | Published: June 27, 2023 10:07 PM

ठाणे स्टेशन परिसरात एकच गर्दी झाल्याचे दिसून आले.

ठाणे : मडगाव येथून सुरु झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे ठाण्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. एकीकडे ठाकरे गटाचे शिवसेनीक तर दुसरीकडे भाजप चे पदाधिकारी यांच्यात मात्र याठिकाणी श्रेया साठी चढाओढे पहायला मिळाली. त्यामुळे ठाणे स्टेशन परिसरात एकच गर्दी झाल्याचे दिसून आले.मंगळवार पासून मडगाव ते सीएसटी वंदे भारत सुरू करण्यात आली. मात्र ठाणे स्थानकात ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले. दोन्ही  बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू होती. यावेळी ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्यासह  संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, संपर्क प्रमुख ओवळा माजिवडा नरेश मणेरा, उपजिल्हाप्रमुख कृष्ण कुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटना व मध्य रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आम्ही केलेल्या प्रयत्नामुळे ही सेवा कोकणातील जनतेला मिळाली असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे शहर अध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे, महिला अध्यक्ष मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक संजय वाघुले आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही कडून जोरदार घोषणाबाजी आणि हाती झेंडे घेऊन शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त होता. 

कोकणातून वंदे भारतची भाजपाने केली होती मागणी

सोलापूर व शिर्डीकडे जाणाऱ्या वंदे भारत सुरू झाल्यानंतर कोकणामधूनही वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी भाजपाचे आमदार प्रविण दरेकर, निरंजन डावखरे, प्रसाद लाड यांच्यासह आमदारांनी ३ मार्च रोजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. त्यावेळी त्यांनी कोकणातील मार्गावर वंदे भारत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची आज पूर्तता झाली असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. पावसाळ्याच्या काळात वंदे भारत आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसthaneठाणेMumbaiमुंबई