शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

गीता जैन यांचे हात बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 00:15 IST

रवींद्र चव्हाण : नगरसेवकांना शहराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची सूचना

भार्इंदर : मीरा-भार्इंदर मतदारसंघातून निवडून आलेल्या गीता जैन या भाजपसोबत आहेत. त्या आपल्याच आमदार असल्याने सर्वांनी एकत्र येऊन शहरहिताचे काम करा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश सांगण्यास आलो असल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप नगरसेवकांच्या बैठकीत सांगितले. चव्हाण यांनी नगरसेवकांशी व्यक्तिगत चर्चा करून म्हणणे ऐकून घेतानाच यापुढे महिन्याच्या चौथ्या शनिवारी भार्इंदरला येऊन आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवकांचे मोबाइल काढून घेण्यात आले होते.

भाजपच्या बंडखोर गीता जैन यांनी नरेंद्र मेहतांचा पराभव केल्याने मेहता व समर्थकांना धक्का बसला आहे. गीता यांना स्वत: मुख्यमंत्र्यांनीच बोलावून घेतल्यानंतर त्यांनीही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. गीता यांनीही मीरा-भार्इंदरच्या विकासासाठी भाजपकडून पूर्ण ताकद मिळायला हवी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली होती. जैन व मेहता यांच्यातील संघर्ष हा आधीपासूनच सुरूहोता. भाजपच्या नगरसेवक असतानाही जैन यांना पक्षाच्या कार्यक्रम, बैठकांपासून लांब ठेवले जात होते. आमदार झाल्यानंतरही त्यांच्याकडे कोणी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी गेले तरी त्यांना जाब विचारला जात होता. त्यातूनच मीरा-भार्इंदरमधील भाजपमध्ये गटबाजी वा सत्तासंघर्ष निर्माण होण्याची भीती होती, असे सूत्रांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार मीरा-भार्इंदरच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. भार्इंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्टमधील ब्ल्यू मून क्लबमध्ये रविवारी चव्हाण यांनी नवनिर्वाचित आमदार जैन यांच्यासोबत भाजप नगरसेवकांची बैठक घेतली. बैठकीस ६१ पैकी सुमारे ४६ नगरसेवक तसेच महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती रवी व्यास, माजी आमदार नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदी उपस्थित होते.यावेळी नगरसेवकांचे मोबाइल काढून घेण्यात आले होते. चव्हाण आदींनी गीता जैन यांचे स्वागत केले.गीता यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला असून मीरा-भार्इंदरमध्ये आपलाच आमदार आहे. त्यामुळे गीता यांच्यासह सर्वांनी मिळून शहराच्या विकासासाठी एकदिलाने काम करा आणि भाजपला आणखी बळकट करा. जे झाले ते विसरून एकोप्याने कामाला लागा. मुख्यमंत्र्यांनीच हे तुम्हाला सांगण्यासाठी मला पाठवले असल्याचे चव्हाण यांनी बैठकीत सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.नगरसेवकांशी चव्हाण यांनी व्यक्तिश: चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. चव्हाण यांनी बैठकीत मुख्यमंत्र्यांचे सांगितलेले निर्देश पाहता जैन या भाजपच्या असल्याचे स्पष्ट करतानाच त्यांना सोबत घेऊन काम करा, असे म्हटल्याने मीरा-भार्इंदर भाजपमधील अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांनीही कात्रीतून सुटका झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. त्याचसोबत गीता यांचे वजन वाढल्याने आता मेहता व त्यांच्या समर्थकांची भूमिका काय राहील, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.जैन समर्थकांसह पत्रकारास दमदाटीनिवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचे पडसाद आज बैठकीदरम्यान पाहायला मिळाले. गीता यांचे समर्थक जितू मेहता यांना माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवीगाळ व धमकी दिली. याप्रकरणी जितू यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. पोलिसांनी त्यांचा अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिल्याने तक्रार अर्ज केल्याचे सांगण्यात आले. तर, स्थानिक वृत्तवाहिनीच्या एका पत्रकारास दमबाजीही करण्यात आली. मेहता समर्थकाने एका कॅमेरामनचा कॅमेरा घेऊन धाक दाखवत व्हिडीओ डिलीट करायला लावला. यावेळी पत्रकार व अन्य लोक उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर