कळव्यात रंगणार राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन, डाॅ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन

By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 15, 2022 06:14 PM2022-12-15T18:14:36+5:302022-12-15T18:14:46+5:30

दर तीन वर्षानी राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे संमेलन सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या कळवा, ठाणे येथील सहकार विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.

State Level Children's Science Conference will be held in Kalva, Inauguration by Dr Anil Kakodkar | कळव्यात रंगणार राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन, डाॅ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन

कळव्यात रंगणार राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन, डाॅ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन

googlenewsNext

प्रज्ञा म्हात्रे -

ठाणे : मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन आयोजन करण्याचा मान मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाला मिळाला आहे. त्यामुळे यावर्षीचे हे संमेलन कळव्यात १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे. 

दर तीन वर्षानी राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे संमेलन सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या कळवा, ठाणे येथील सहकार विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते शनिवार १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. होणार आहे. या बालविज्ञान संमेलनात महाराष्ट्रातील सुमारे १२० विद्यार्थी व ३० शिक्षक सहभागी होणार असून आपापले प्रयोग/ प्रकल्प सादर करणार आहेत. त्यातून पारितोषिकासाठी प्रकल्प निवडले जाणार आहेत. या संमेलनात विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्सची कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. या संमेलनात मध्यवर्तीचे अध्यक्ष डाॅ. ज्येष्ठराज जोशी, ठाणे विभागाचे अध्यक्ष दा.कृ.सोमण, पुरूषोत्तम पाचपांडे, मकरंद जोशी, हेमंत मोने, डाॅ. जान्हवी गांगल, डाॅ. नागेश टेकाळे, पुष्पलता डुंबरे, अ. पा. देशपांडे, ना.द. मांडगे , डाॅ. अमोल भानुशाली आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. नेहरू सायन्स सेंटरतर्फे प्रयोगही सादर केले जाणार आहेत सोमवार १९ डिसेंबर रोजी विज्ञान सहल आयोजित केली असून त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने चार बसेसची व्यवस्था केली आहे. या विज्ञान सहलीत मुलुंड येथील केळकर काॅलेजमधील प्रकल्प व ओवळा ठाणे येथील फुलपाखरू उद्यानाला भेटी आयोजित केल्या आहेत.
 

Web Title: State Level Children's Science Conference will be held in Kalva, Inauguration by Dr Anil Kakodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.