शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
2
वादग्रस्त निर्णय! RCB चा फलंदाज बाद होता, गावस्करांसह अनेकांचा दावा; अम्पायरने दिले नाबाद
3
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
4
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
5
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
6
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
7
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
8
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
9
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
10
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
11
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
12
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
13
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
14
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
15
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
16
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
17
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
18
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
19
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
20
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

मुंब्रा, रबाले भागातील दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:44 PM

दिवा, दातिवलीपाठोपाठ अवघ्या २४ तासांमध्ये खर्डी ते आगासन दरम्यानच्या खाडी किनारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारुच्या रसायनासह तीन लाखांचा ऐवज जप्त केला.

ठळक मुद्देखर्डी ते आगासन दरम्यान खाडी किनारी धाडसत्रदारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह तीन लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्तअवघ्या २४ तासांमध्ये दुसरी कारवाई

ठाणे : मुंंब्रा, डायघर आणि रबाले भागातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाने शुक्रवारी दिवसभर धाडसत्र राबविले. या धाडीत दारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह तीन लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक एन. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील आणि पी. पी. घुले आदींच्या पथकाने शुक्रवारी (१५ डिसेंबर रोजी ) खर्डी ते आगासन दरम्यान खाडी किनारी भागात गावठी हातभट्टीवरील दारु निर्मितीच्या तीन अड्डयांवर कारवाई केली. यामध्ये रसायनाने भरलेले २०० लीटर क्षमतेचे ६२ प्लास्टीकचे ड्रम, २०० लीटर क्षमतेचे रिकामे ४८ तसेच १२ हजार ८०० लीटर रसायन असा तीन लाख ८०० रुपयांचा ऐवज जप्त करुन नाश केल्याची माहिती अधीक्षक नाना पाटील यांनी दिली.याशिवाय, नवी मुंबईच्या रबाले परिसरातही बोज्जावार यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये गावठी दारुची विक्री करणा-या रामदास धांडे, राजू शाह आणि साहेबराव तायडे या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २० लीटर गावठी दारुसह सहा हजार ३६८ रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली....................................२४ तासांमध्ये दुसरी कारवाईराज्य उत्पादन शुल्क विभागाने दिवा, दातिवली परिसरातील गावठी दारुच्या अड्डयांवर गुरुवारी सकाळी धाडसत्र राबविले. या धाडीत तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १९८० लीटर गावठी दारुसह इतर सामुग्री असा एक लाख सात हजार ६१० रुपयांचा ऐवज जप्त केला. या घटनेला २४ तास उलटण्याच्या आतच शुक्रवारी खर्डी ते आगासन दरमयानच्या खाडी किनारी भागातील दारु अड्डयांवर या विभागाने ही कारवाई केल्याने अवैध दारु अड्डेचालकांचे चांगलेच दाबे दणाणले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्र