Join us  

वादग्रस्त निर्णय! RCB चा फलंदाज बाद होता, गावस्करांसह अनेकांचा दावा; अम्पायरने दिले नाबाद

RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी कच खाल्ली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 8:55 PM

Open in App

RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. विराट कोहली व रजत पाटीदार वगळता राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांसमोर त्यांनी शेपूट घातले. ट्रेंट बोल्टने पहिल्याच स्पेलमध्ये RCB वर दडपण निर्माण केले होते. त्यानंतर युझवेंद्र चहलने विराटची विकेट मिळवून दिली. आर अश्विनने सलग दोन विकेट घेऊन RCB ला बॅकफूटवर फेकले. त्यात दिनेश कार्तिकला नाबाद दिल्याचा निर्णय वादग्रस्त ठरतोय. 

विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 

फॅफ ड्यू प्लेसिने एलिमिनेटर सामन्यात RCBच्या चाहत्यांना निराश केले. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर रोव्हमन पॉवेलने अफलातून झेल घेऊन राजस्थान रॉयल्सला पहिले यश मिळवून दिले. फॅफ १७ धावांवर माघारी परतला. विराटने मैदानावर उभं राहून आज २९ वी धाव घेताच आयपीएल इतिहासात ८००० धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. RCB ने पॉवर प्लेमध्ये १ बाद ५० धावा केल्या आणि बोल्टने पहिल्या स्पेलमध्ये ३ षटकांत ६ धावा देत १ विकेट मिळवली. आठव्या षटकात संजू सॅमसनने गोलंदाजीला युझवेंद्र चहलला आणले आणि त्याने विराटला मोठा फटका मारण्यास भाग पाडून बाद केले. विराट २४ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर माघारी परतला.  १० षटकांत RCB ने २ बाद ७६ धावा केल्या. ११व्या षटकात रजत पाटीदारने ( ५) अश्विनच्या गोलंदाजीवर झेलची संधी दिली होती, परंतु ध्रुव जुरेलने सोपा झेल टाकला. पण, अश्विनने त्याच्या पुढच्या षटकात चमत्कार करून दाखवला. कॅमेरून ग्रीन ( २७) व ग्लेन मॅक्सवेल ( ०) यांना त्याने सलग चेंडूवर माघारी पाठवून RCB ची अवस्था ४ बाद ९७ अशी केली. रोव्हमन पॉवेल व ध्रुव जुरेल यांनी हे झेल टिपले.  ग्लेन मॅक्सवेलने या संपूर्ण हंगामात निराश केले. त्याने ११ सामन्यांत केवळ ५८ धावा केल्या आहेत. आर अश्विनने त्याच्या ४ षटकांत १९ धावा देताना २ विकेट्स घेतल्या.  ५ धावांवर जीवदान मिळालेल्या पाटीदारने RRच्या चहलचा समाचार घेताना एका षटकात १९ धावा चोपल्या. १५व्या षटकात आवेश खानचा पहिला चेंडू पाटीदारने थर्ड मॅनच्या वरून षटकार खेचला, परंतु पुढच्या चेंडूवर त्याची विकेट पडली. पाटीदार २२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर आवेशने इनस्विंग डिलिव्हरीवर दिनेश कार्तिकला पायचीत केले होते, परंतु DRS मध्ये बॅटचा चेंडूला पहिला स्पर्श केल्याचे दिसले आणि निर्णय बदलला गेला. पण, पुन्हा रिप्ले पाहिल्यास बॅट आणि पॅडचा संपर्क झाला होता... त्यामुळे कार्तिक बाद होता आणि अम्पायरच्या चुकीमुळे RR ला ही विकेट मिळू शकली नाही. सुनील गावस्कर यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, बॅट पॅडवर आदळली, बॅटचा चेंडूशी संपर्क झालाच नव्हता. 

 

  

 

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिनेश कार्तिकराजस्थान रॉयल्स