शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

सामान्यांसाठी रविवारी लोकल सेवा सुरू करा, प्रवासी संघटनेची मागणी    

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 1:16 AM

Mumbai Suburban Railway News : मुंबईतील बहुतांश कार्यालयांना रविवारी सुटी असल्याने या दिवशी सर्व लोकल रिकाम्या धावतात. त्यामुळे रविवारी लोकल प्रवास खुला करावा

डाेंबिवली - सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा कधीपासून सुरू होणार आहे, हे राज्य सरकारने तत्काळ स्पष्ट करावे. निदान पुढील काही दिवस रविवारी सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी. मुंबईतील बहुतांश कार्यालयांना रविवारी सुटी असल्याने या दिवशी सर्व लोकल रिकाम्या धावतात. त्यामुळे रविवारी लोकल प्रवास खुला करावा, अशी मागणी करणारे पत्र उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन सचिव व रेल्वेशी समन्वय साधणारे अधिकारी अजय यावलकर यांना बुधवारी दिले.संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी पत्रात आणखी काही मागण्या केल्या असून, त्याचा तातडीने विचार करावा, असे म्हटले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी बाहेरगावी प्रवासाला जाणाऱ्यांना अपडाउन मार्गांवर दादर, ठाणे, कल्याणपासून उपनगरांकडे लोकलने प्रवास करू दिला जात नाही. परिणामी, प्रवाशांना टॅक्सी-रिक्षाने पुढील उपनगरी प्रवासाचा भुर्दंड पडतो. अशा प्रवाशांना लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या तिकिटावरच लोकलचे तिकीट व लोकल प्रवासाची परवानगी मिळावी. तसेच एम इंडिकेटर ॲपवर अद्याप लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे जुने वेळापत्रक दर्शवले जात आहे. अनलॉकमध्ये ज्या लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू झाल्या आहेत, त्यांचे वेळापत्रक वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.सर्वसामान्य महिलांप्रमाणे पुरुष आणि युवकांनाही सकाळी ११ ते दुपारी ३ व सायंकाळी ७ नंतर लोकल प्रवासाची मुभा मिळणे आवश्यक आहे. महिलांना सध्याच्या सवलतीत सकाळी नोकरीवर जाण्यासाठी प्रवास करता येत नाही. त्यामुळे त्यांना गर्दी सुरू होण्यापूर्वी म्हणजे सकाळी ८ पूर्वी प्रवासाची परवानगी द्यावी. त्यामुळे रस्ते प्रवासातील त्रासापेक्षा रेल्वेने तासभर लवकर ऑफिसला जाणे परवडेल, असे महिलांचे म्हणणे असल्याचे देशमुख म्हणाले. 

ट्रान्स-हार्बरवर अर्ध्या तासाने लोकल सोडा ट्रान्स-हार्बरवर सध्या दर एक तासाने लोकल असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे किमान दर अर्ध्या तासाने पनवेल व वाशी मार्गावर लोकल सोडावी. कर्जत-खोपोली सेक्शनवर लोकल सेवा, वसई-दिवा-पनवेल, रोहा सेक्शनवरील प्रवासीफेऱ्या पूर्ववत सुरू होणे गरजेचे आहे, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेthaneठाणेCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक