ठाण्यात रिक्षाचालकाच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 21:54 IST2019-10-09T21:47:58+5:302019-10-09T21:54:23+5:30

पत्नी आणि मुलीबाबत उलट सुलट बोलल्याचा जाब विचारत ठाण्यातील संजय जयस्वाल या रिक्षा चालकाच्या डोक्यावर दगडाने प्रहार करीत राजेंद्र जैस्वार या रिक्षा चालकासह दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना ६ आॅक्टोंबर रोजी घडली.

 Stabbed on autorickshaw driver with stones | ठाण्यात रिक्षाचालकाच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून मारहाण

पूर्ववैमनस्यातून केला हल्ला

ठळक मुद्देचितळसर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हापूर्ववैमनस्यातून केला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पूर्ववैमनस्यातून संजय जैस्वाल (३६, रा. गांधीनगर, पोखरण रोड क्रमांक दोन, ठाणे) या रिक्षाचालकाच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून त्याला जबर मारहाण करणा-या राजेंद्र जैस्वार (३६) आणि सुरज जैस्वार (२५, रा. दोघेही काल्हेर, भिवंडी) या दोघांविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गांधीनगर येथील रहिवासी असलेल्या संजय या रिक्षाचालकाला त्याच्याच ओळखीचा रिक्षाचालक राजेंद्र याने त्याचा साथीदार सुरज यांनी ६ आॅक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास ‘हाइड पार्क’, सूर्या टॉवरजवळ क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. ‘तू माझी पत्नी आणि मुलीबाबत उलटसुलट का बोलला’ असे म्हणून राजेंद्रने त्याला मारहाण केली. त्यावेळी सुरजने त्याला पाठीमागून पकडले, तर राजेंद्रने तिथे जवळच पडलेल्या दगडाने त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्याला जखमी केले. यात तो रक्तबंबाळ झाला. ही माहिती मिळताच चितळसर पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. संजयची पत्नी बिटोलादेवी (३६) यांनी याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध ७ आॅक्टोबर रोजी तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title:  Stabbed on autorickshaw driver with stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.