शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अंबरनाथ, बदलापूरमध्येही एसआरए योजना लागू , सरकारची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 02:12 IST

मुंबई महानगर क्षेत्र हे उद्योग व रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगाराच्या निमित्ताने येथे येतात. मुंबई-ठाणे-नवी मुंबई या महानगरांमध्ये राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार अशा नगरपालिका क्षेत्रांत राहण्यासाठी ओढ असते.

अंबरनाथ - मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या ‘अ’ वर्ग नगरपालिका क्षेत्रांत झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अंबरनाथ, बदलापूर या पालिकांमधील वाढती झोपडपट्टी पाहता येथे ही योजना लागू झाल्याने येथील झोपडीवासीयांनाही चांगले जीवन जगता येईल, असा विश्वास आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी व्यक्त केला.मुंबई महानगर क्षेत्र हे उद्योग व रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगाराच्या निमित्ताने येथे येतात. मुंबई-ठाणे-नवी मुंबई या महानगरांमध्ये राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार अशा नगरपालिका क्षेत्रांत राहण्यासाठी ओढ असते. त्यामुळे या नगरपालिका क्षेत्रांमध्येही झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरांतील सुविधांवर ताण येत आहे. त्यामुळे या क्षेत्रांत एसआरए योजना लागू व्हावी, यासाठी किणीकर यांनी पाठपुरावा केला होता. बीएसयूपी योजना अपयशी ठरल्यानंतर केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेलाही नगरपालिका क्षेत्रांमध्ये योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने एसआरएची गरज होती.शहराचा सुनियोजित विकास साधण्यासाठी झोपडपट्टीचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने एसआरए योजना अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.- डॉ. बालाजी किणीकर, आमदार, अंबरनाथ

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूर