भिवंडीत जावयाची सासूला मारहाण; अखेर जावयाविरुद्ध गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Updated: September 11, 2023 20:15 IST2023-09-11T20:14:48+5:302023-09-11T20:15:23+5:30

दानिश फैजान खान वय २५ वर्ष रा. गायत्री नगर असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे.

Son-in-law assaulted mother-in-law in Bhiwandi, case registered against son-in-law | भिवंडीत जावयाची सासूला मारहाण; अखेर जावयाविरुद्ध गुन्हा दाखल

भिवंडीत जावयाची सासूला मारहाण; अखेर जावयाविरुद्ध गुन्हा दाखल

नितीन पंडित

भिवंडी: सासूच्या घराशेजारी राहणारा जावई दारू पिऊन मुलीला मारहाण व शिवीगाळ करत असल्याने मुलीने तिच्या मुलांसह आपल्या घरी राहण्यास यावे असे सांगणाऱ्या सासूला जावयाने रॉडने मारहाण केल्याची घटना शहरातील गायत्री नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी सासूने दिलेल्या तक्रारीवरून जावयाविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         

दानिश फैजान खान वय २५ वर्ष रा. गायत्री नगर असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे. तो दारू पिऊन पत्नी कैफिया हिस नेहमी मारहाण व शिवीगाळ करत असे.शुक्रवारी त्यांच्यात जोरदार भांडण झाल्याने हे भांडण सोडविण्यासाठी दानिशची सासूबाई खुर्शीदाबानो फकरुद्दीन अन्सारी वय ६० वर्ष. या आल्या असता त्यांनी कैफिया हिस मुलांसोबत आपल्या घरी राहायला चल असे सांगितले. या गोष्टीचा राग दानिश यास आल्याने त्याने लोखंडी रॉडने सासूबाईला मारहाण केली. या मारहाणीत सासूबाईच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून तीचे दोन बोटे फ्रॅक्चर झाले आहेत. तर दानिशचा मुलगा तारीक हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये आला असता त्याला देखील लोखंडी रोडने मारल्याने तारीकच्या नाकावर दुखापत झाली आहे. या मारहाणी प्रकरणी सासू खुर्शीदाबानो यांनी जावई दानिश विरोधात शांतिनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Son-in-law assaulted mother-in-law in Bhiwandi, case registered against son-in-law