शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

...म्हणून जुनी ब्रिटिशकालीन मोठी विहीरच बुझवायला घेतली; मीरा-भाईंदर महापालिकेचा नवा प्रताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 12:21 IST

तर काही फुटांवरच ब्रिटिशकालीन जुन्या विहिरी लगतचा रस्ता खचला. तर सदर दोन्ही ठिकाणी खचलेल्या भागावर महापालिकेने गेल्या पावसाळ्यापासून दुरुस्ती कामच हाती घेतले नाही. 

मीरा रोड - गेल्या पावसाळ्यात उत्तन-डोंगरी येथे खचलेला रस्ता दुरुस्त करायची उपरती आता झालेल्या मीरा-भाईंदर महापालिकेने संरक्षण भिंत बांधण्यासाठी चक्क ब्रिटिशकालीन जुनी मोठी विहीरच बेकायदा माती भराव करून बुझवायला घेतल्याने कारवाईची मागणी स्थानिकांसह वनशक्ती संस्थेने केली आहे. भाईंदरच्या डोंगरी -  उत्तन ह्या मुख्य रस्त्यावर लहान व अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. गेल्या पावसाळ्यात आनंद नगर येथे तलावाची संरक्षण भिंत खचली. जेणेकरून रस्ता काहीसा खचला. तर काही फुटांवरच ब्रिटिशकालीन जुन्या विहिरी लगतचा रस्ता खचला. तर सदर दोन्ही ठिकाणी खचलेल्या भागावर महापालिकेने गेल्या पावसाळ्यापासून दुरुस्ती कामच हाती घेतले नाही. 

येथे वाहन चालकांना इशारा मिळेल, अश्या आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत. येथील रस्त्यात बसवलेल्या लोखंडी सुरक्षा खांबामुळे रात्रीच्या काळोखात अपघात होऊ लागले. तर पालिकेने समोरच्या बाजूने रस्ता वाढवण्याकडेसुद्धा डोळेझाक केली. जेणेकरून महापालिकेच्या भोंगळ कारभारावर यामुळे टीकेची झोड उठली. 

त्यातच आता पावसाळा तोंडावर आल्यावर पालिकेला जाग आली आणि विहिरीकडील रस्त्याची दुरुस्ती संरक्षक भिंत बांधून करण्याऐवजी महापालिकेच्या महाभागांनी खचलेल्या ठिकाणची सुस्थितीत असलेली ब्रिटिशकालीन विहीरच भराव टाकून बंद करण्याचा प्रकार सुरू केला. पालिकेच्या या अजब कारभारावर टीकेची झोड वेलेरिन पांडरीक, शॉन कोलासो आदींनी उठवली व संताप व्यक्त केला.  पालिकेने संरक्षक भिंत बांधण्याऐवजी जुनी विहीरच बुझवण्याचा केलेला प्रकार म्हणजे एखाद्या डायबेटिक रुग्णास पायच्या बोटाला गँगरिन झाल्यामुळे त्या रुग्णाचा संपूर्ण पायच काढून टाकणे, असा उफराटा असल्याची टीका कोळसे यांनी केली आहे. त्यांच्यासह वनशक्तीचे संचालक स्टॅलिन यांनी देखील  विहिरीतील भराव काढून सबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि विहिरी पूर्ववत करून संरक्षण भिंत रस्त्यासाठी बांधून घ्यावी अशी मागणी केली आहे. पालिकेचे अधिकारी मात्र विहिरीचा भाग पडल्याने रस्ता खचला असून, धोकादायक झाला आहे. त्यामुळे संरक्षण भिंत बांधण्यासाठी भराव करत असल्याचे कारण सांगितले.      महापालिका आणि येथील काही लोकप्रतिनिधी यांनी निसर्ग व पर्यावरणाचा सतत ऱ्हासच चालवला असून, या आधी देखील अनेक प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. तरी देखील पालिका निसर्गाचा नाश करण्याचे प्रकार थांबवत नसल्याने चीड स्टॅलिन यांनी व्यक्त केली आहे.  संरक्षण भिंत बांधायची म्हणून उद्या तलाव, खाडी आणि समुद्र सुद्धा भराव टाकून पालिका बंद करणार का ?, विहिरी , तलाव, खाडी , नैसर्गिक प्रवाह आदी बुझवता येत नाहीत व त्यात बांधकामे करता येत नाही असे ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर