शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जेवायला गेले आणि सुदैवाने तिघेही वाचले, मृतांमध्ये उ. प्रदेश, बिहारमधील कामगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 08:28 IST

अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून, गर्डर टाकताना सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या किंवा कसे हे तपासले जाईल, असे मंत्री भुसे व चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले. 

नारायण शेट्टी -

शहापूर :   समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातमृत्यू झालेले बहुतांश कामगार हे उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू अशा विविध प्रांतांतील आहेत. केवळ तीन कामगार किरकोळ जखमी झाले, तर तीन कामगार जेवण करायला गेल्याने सुदैवाने बचावले.

दुर्घटनेची  माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्यासोबत  सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनीसुद्धा शहापूर उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले आणि जखमींची विचारपूस केली. 

अधिकाऱ्यांची देखरेख --  दुर्घटनेची माहिती मिळताच एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, आमदार दौलत दरोडा,  सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पवार  यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली. -  विक्रम देशमाने पोलिस अधीक्षक (ठाणे ग्रामीण), पोलिस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, पोलिस निरीक्षक अनंत पराड, सिव्हिल सर्जन रवींद्र पवार यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्यावर देखरेख केली. 

उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून, गर्डर टाकताना सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या किंवा कसे हे तपासले जाईल, असे मंत्री भुसे व चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले. 

मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली, तर पंतप्रधान मदत निधीतून दोन लाखांची मदत दिली जाणार आहे. 

घटनाक्रम -सोमवारी रात्री ११:५० वा. : शहापूर तालुक्यातील सरलांबे येथील समृद्धी महामार्गाच्या गर्डर टाकण्याच्या कामाच्या ठिकाणी गर्डर लाँचर कोसळला.मध्यरात्री १२ वा. : गर्डर कोसळतानाचा आवाज ऐकताच सरलांबे व आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थ मदतीकरिता घटनास्थळी धावले.मध्यरात्री १ वा. : पोलिसांचे मदतकार्य सुरू.मध्यरात्री २ वा. : तीन मृतदेह ग्रामस्थांनी बाहेर काढले.पहाटे ४ वा. : जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने घटनास्थळी दाखल.पहाटे ४:३० वा. : हायड्रॉलिक क्रेन मदतकार्याकरिता दाखल.पहाटे ५ वा. : मंत्री दादा भुसे व मंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी दाखल.सकाळी ६ वा. : गर्डर उचलण्यास प्रारंभसकाळी ७ वा. : एनडीआरएफ व टीडीआरएफची टीम मदतकार्यासाठी दाखल.सकाळी ९ वा. : शहापूर उपजिल्हा रुग्णालयात १४ मृतदेह शवविच्छेदनाकरिता नेण्यात आले.दुपारी ४ वा. : मृतांची संख्या पोहोचली १८ वर. सायंकाळी ६ वा. : मदतकार्य सुरूच. मृतांची संख्या २०वर. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघातDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार