शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
2
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
3
सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा
4
Kangana Ranaut : कंगनाला मिळणार इतका पगार; मोफत घरासह आलिशान सुविधा, खासदार झाल्यावर बदलणार आयुष्य
5
National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
6
'अजून किती वेळ?', सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला झाली ४ वर्ष, मित्राने पोस्ट करत विचारले प्रश्न
7
Durgashtami: आज शुक्रवार आणि दुर्गाष्टमी, या संयोगावर घरच्याघरी करा लक्ष्मी कुंकुमार्चन; होतील अनेक लाभ!
8
"फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट
9
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण?
10
खासदार होताच युसूफ अडचणीत; गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी नोटीस
11
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
12
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचं आमंत्रण मिळाल्यावर पूनम ढिल्लो म्हणाल्या, "जहीर, प्लीज तिला..."
13
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
14
PHOTOS : अमेरिकेत 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज! भारतीय शिलेदाराची पत्नीसोबत भटकंती
15
USA vs IRE : पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील भवितव्य आज ठरणार; अमेरिकेच्या हाती सर्वकाही
16
जबरदस्त! या कंपनीच्या शेअरवर म्यूचुअल फंडांच्या उड्या, एकाच महिन्यात खरेदी केले १४००००००० शेअर
17
Saudi vs USA: सौदी अरबने अमेरिकेला दिला ५० वर्षांतील सर्वात मोठा धक्का, प्रकरण काय?
18
विशेष लेख : ...आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती?
19
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
20
भारत-पाकिस्तान क्रिकेट रद्द करा! उद्धवसेनेकडून पंतप्रधानांना पाठविले पत्र

स्मार्ट गव्हर्नन्स, सुरक्षित शहर, इंटिग्रेटेड ट्रान्झिस्टला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:09 AM

२४३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मिळाली मंजुरी

कल्याण : कल्याण-डोंबिवलीस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी तयार केलेल्या स्मार्ट गव्हर्नन्स, सुरक्षित शहर, इंटिग्रेटेड ट्रान्झिस्ट आणि जीआयएस या चार सविस्तर प्रकल्प अहवालांना स्मार्ट सिटी कंपनीने सोमवारी झालेल्या १२ व्या बैठकीत मंजुरी दिली आहे. हे चार प्रकल्प २४३ कोटी ५६ लाख रुपये खर्चाचे असून, त्यासाठी लवकरच निविदा मागविली जाणार आहे.स्मार्ट गव्हर्नन्स हा प्रकल्प ३३ कोटी १० लाख रुपयांचा आहे. तर, सुरक्षित शहर प्रकल्प १६९ कोटी ७९ लाख रुपये, इंटिग्रेटेड ट्रान्झिस्ट केडीएमटीसाठी २९ काटी ४५ लाख आणि जीआयएसप्रणाली विकसित करण्यासाठी ११ कोटी २२ लाख रुपये खर्च होणार आहेत.ई-गव्हर्नन्स प्रणाली राबवणारी केडीएमसी ही राज्यातील पहिली महापालिका आहे. केडीएमसीच्या या प्रणालीचा वापर सध्या राज्यभरात होत आहे. त्यापोठापाठ आता स्मार्ट गर्व्हनन्स प्रकल्पात २३ मॉड्युल विकसित केले जाणार आहेत. त्यात मालमत्ताकर, पाणी देयके, वित्त व लेखा विभाग, सिटी पोर्टल, मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, विवाह व जन्म मृत्यू नोंदणी, परवाने, नागरी सुविधा केंद्र, तक्रार निवारण, माहिती अधिकार सेवा, शहर अभियांत्रिकी, जमीन व मालमत्ता व्यवस्थापन, इमारत नकाशा मंजुरी, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य योजना, कल्याणकारी योजना, कायदा व्यवस्थापन, दस्ताऐवज व्यवस्थापन आणि प्लिंथ मॅनेजमेंट यांचा समावेश असणार आहे. या विभागांच्या सेवा अधिक गतमान केल्या जाणार आहेत.स्मार्ट व सुरक्षित शहरासाठी शहरांतील प्रमुख चौकात सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित केली जाणार आहे. त्यात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. तसेच शहराच्या पर्यावरणाची स्थिती दाखवणारी सेन्सर प्रणाली असेल. त्यामुळे पावसाळ्यात पर्जमापन, पूरस्थिती वैगरे स्थिती पूर्वसूचना देता येणार आहे. स्मार्ट सिटी आॅपरेशन व सर्व्हिलन्स कमांड सेंटर विकसित केले जाणार असून, ड्रोनद्वारे शहरावर नजर ठेवली जाईल.इंटिग्रेटेड ट्रान्झिस्ट सिस्टममध्ये सर्व समावेशक व स्वयंचलित वाहतूक व्यवस्थापन असेल. त्यात कल्याण-डोंबिवली परिवहन बस सेवेचा समावेश केला आहे. त्यात स्वयंचलित भाडे संकलन, स्थानक व्यवस्थापन, बसचे वेळापत्रक, कार्यशाळा व्यवस्थापन, स्वयंचलित वाहनस्थान प्रणाली, प्रवासी माहिती प्रणाली विकसित केली जाणार आहे. जीआयएस प्रणालीत जीएसआयचा प्लॅटफॉर्मची खरेदी करणे. तसेच जीआयएस अ‍ॅप्लिकेशन सुधारित करणे, उपग्रह प्रतिमा खरेदी करणे, जीआयएस आधार नकाशा अंतिम करणे, याचा समावेश आहे.प्रमोद कुलकर्णी यांच्याकडे पदभारस्मार्ट सिटी कंपनीच्या जनरल मॅनेजर पदाच्या भरतीसाठी चार उमेदवारांचे अर्ज आले. मात्र, मुलाखतीत ते चारही उमेदवार अपात्र ठरले. पुन्हा मुलाखतीसाठी अर्ज मागवले असता आठ जणांचे अर्ज आले. नमूद केलेल्या अनुभवानुसार आठही उमेदवार पात्र नसल्याने मुलाखतीच झाल्या नाहीत.त्यानंतर कंपनीने अजित शर्मा यांची जनरल मॅनेजरपदी नियुक्ती केली. त्यांनी पदावर रूजू होण्यास असमर्थता दर्शविल्याने सहा महिन्यांसाठी प्रमोद कुलकर्णी यांची नियुक्त करण्यास मंजुरी दिलीगेली आहे.कुलकर्णी हे महापालिकेतील शहर अभियंता पदावरून निवृत्त होत असल्याने त्यांना ही जबाबदारी दिली आहे. त्यांनी स्मार्ट सिटीच्या सुरुवातीपासून काम पाहिले आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका