नालासोपाऱ्यातून सहा बांगलादेशी घुसखोरांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 05:45 IST2019-05-06T05:45:44+5:302019-05-06T05:45:56+5:30

पश्चिमेकडील टाकीपाडा परिसरात घुसखोरी करून राहणाºया सहा बांगलादेशी तरुणांना वसई गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे.

 Six Bangladeshi intruders arrested in the cavalcade | नालासोपाऱ्यातून सहा बांगलादेशी घुसखोरांना अटक

नालासोपाऱ्यातून सहा बांगलादेशी घुसखोरांना अटक

नालासोपारा  - पश्चिमेकडील टाकीपाडा परिसरात घुसखोरी करून राहणाºया सहा बांगलादेशी तरुणांना वसई गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात भारतीय पासपोर्ट अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही बांगलादेशी तरुण नालासोपारा पश्चिमेकडील टाकीपाडा परिसरात अनधिकृत वास्तव्य करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर, परिसरात धाड टाकून गुन्हे शाखेने कौशद अजिजुद शेख, अब्दुल रेहमान अब्दुल जलील शेख, सईद समशेर शेख, शमीम फरीद शेख, मोहम्मद सिद्दीक रझाक मिर्जा आणि शमीम सलिम शेख यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे भारतात राहण्याचा पुरावा मागितला असता, ते सादर करू शकले नाहीत. अखेर त्यांना अटक करून अधिक तपासासाठी नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title:  Six Bangladeshi intruders arrested in the cavalcade