शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

तुमची खुमखुमी विरोधकांना दाखवा, राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 2:46 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या गटबाजीचा पक्ष निरीक्षकांनी समाचार घेताना पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

- प्रशांत मानेकल्याण - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या गटबाजीचा पक्ष निरीक्षकांनी समाचार घेताना पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. आपापसांतील वाद, आरोप-प्रत्यारोप पक्षासाठी घातक आहेत. तुमच्यातली ही खुमखुमी सेना-भाजपा या विरोधकांना दाखवा. आपापसांत भांडू नका, अशा शब्दांत त्यांनी पदाधिकाºयांची कानउघाडणी केली. कल्याण पूर्वेत झालेल्या बैठकीत निरीक्षकांनी संबंधितांच्या डोळ्यांत अंजन घातल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली होती; प्रत्यक्ष निरीक्षकांनी मात्र याबाबत मौन बाळगले आहे.राष्ट्रवादीमध्ये गटबाजी उफाळून आली असून असेच सुरू राहिल्यास निवडणुकांना सामोरे कसे जायचे, असा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडला आहे. तोंडावर आलेली लोकसभा, विधानसभा आणि केडीएमसी या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे लोकसंवाद, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर यासारख्या कार्यक्रमांवर भर दिला जात आहे. या सर्वांचा आढावा घेण्यासाठी जानेवारीत विशेष शिबिर, मेळावे घेण्यात येणार आहेत. ६ जानेवारीला डोंबिवली, १३ तारखेला कल्याण पश्चिम, २० तारखेला कल्याण पूर्व, तर २७ जानेवारीला कल्याण ग्रामीणमध्ये हे शिबिर होणार असून राष्ट्रवादीचे प्रदेश नेते उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवरप्रवीण खरात (कल्याण पश्चिम), भरत गंगोत्री (कल्याण पूर्व), सुहास देसाई (कल्याण ग्रामीण) आणि सुभाष पिसाळ (डोंबिवली) यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून ते विधानसभास्तरावर बैठका घेऊ न निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेत आहेत. फेब्रुवारीमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कल्याण-डोंबिवलीत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी सर्व निरीक्षक आणि पदाधिकाºयांची विशेष बैठक झाली. आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या बंगल्यावर झालेल्या या बैठकीला गंगोत्रीवगळता देसाई, पिसाळ, खरात हे निरीक्षक उपस्थित होते. तर, कल्याण ग्रामीणचे नेते डॉ. वंडार पाटील यांच्यासह सेवादल, वकील, डॉक्टर, कामगार, माहिती-तंत्रज्ञान, महिला आघाडी व अन्य विविध सेलचे एकूण २५ अध्यक्ष, चार विधानसभा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव असे जिल्ह्यातील ४० ते ४५ पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत कल्याण जिल्ह्यातील पक्षाची स्थिती, चारही विधानसभा स्तरावरील पक्षसंघटना बांधणी, कमिट्या गठीत केल्या आहेत का, पक्षांतर्गत घेतले गेलेले कार्यक्रम याबाबत निरीक्षकांनी पदाधिकाºयांकडून माहिती घेतली. यावेळी गटबाजी, प्रोटोकॉल न पाळणे, श्रेयवाद आदींवरही चर्चा झाली. यावेळी काही पदाधिकाºयांनी चढ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना निरीक्षकांनी खडेबोल सुनावले. यासंदर्भात डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक पिसाळ यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतर्गत बैठका सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून रविवारची बैठक झाल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.संजीव नाईक यांनीही केली कानउघाडणीमाजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस संजीव नाईक यांनी १६ डिसेंबरला राष्ट्रवादी काँगे्रसच्या लोकसंवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावली होती.त्यावेळी राष्ट्रवादीचे कल्याण- डोंबिवली जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. त्यांना विश्वासात न घेता कार्यक्रम घेतल्याचे बोलले जात होते.हनुमंते यांनी मात्र मी एका अन्य कार्यक्रमात व्यस्त असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला होता.दरम्यान, जिल्हाध्यक्षांना विश्वासात न घेता आयोजन केल्याबद्दल नाईक यांनी आयोजकांची कानउघाडणी केल्याची चर्चा आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस