शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

ठाण्यात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल हाऊसफुल्ल

By admin | Published: August 08, 2016 2:09 AM

नाट्यगृहातून बाहेर पडताना बच्चेकंपनीबरोबरच पालकांच्या ओठांवर गाणी, आपल्या मित्रमैत्रिणींचे किस्से, हास्य, शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट आहे, अशा प्रतिक्रिया आणि त्यांच्या मनात रुजलेले सामाजिक विचार

स्नेहा पावसकर, ठाणेनाट्यगृहातून बाहेर पडताना बच्चेकंपनीबरोबरच पालकांच्या ओठांवर गाणी, आपल्या मित्रमैत्रिणींचे किस्से, हास्य, शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट आहे, अशा प्रतिक्रिया आणि त्यांच्या मनात रुजलेले सामाजिक विचार, असे वातावरण पाहायला मिळाले, ते काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात. निमित्त होते ते राजू तुलालवार निर्मित तीन शॉर्ट फिल्मचे. पहिलाच आणि विशेष शो हाऊसफुल्ल झाल्याने त्या शॉर्ट फिल्मचे प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सादरीकरण करण्यात आले. लहान मुलांचे मनोरंजन करण्याच्या दृष्टीने राजू तुलालवार यांनी हसवणारी मुले, कट्टीबट्टी आणि मॉनिटर या तीनही शॉर्ट फिल्म तयार केल्या आहेत. घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये शनिवारी त्याचा विशेष शो झाला. हाऊसफुल्लमुळे अनेकांना शो ला बसण्याची संधी मिळाली नाही. मात्र, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहता पहिल्या शोनंतर पुन्हा त्या शॉर्ट फिल्म दाखवण्याचा निर्णय तुलालवार यांनी घेतला. या तिन्ही शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून तुलालवार यांनी मुलांचे भावविश्व साध्या शब्दांत आणि सोप्या पद्धतीने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या शॉर्ट फिल्ममधून मुलांसाठी देऊ केलेले संदेश हे सर्वच वयांतील व्यक्तींना विचार करायला लावणारे आहेत. यातील घटना या प्रेक्षकांना आपल्या वाटतात. वाढत्या वयाबरोबर माणसं हसणं विसरतात, हसण्याने आयुष्य वाढते, हसा आणि हसवा... तर हसताना प्रत्येक जण छान दिसतो. हसणार तो जगणार, रडणार तो संपणार, असा संदेश हसवणारी मुले या शॉर्ट फिल्ममधून बालकलाकारांनी दिला आहे. वर्गात आपल्या बेस्ट फ्रेण्डकडून आपल्याला इतरांपेक्षा वेगळ्या अपेक्षा असतात. मात्र, एखाद्या वेळी गैरसमजामुळे मैत्रीवर परिणाम होतो. मात्र, खरी मैत्री कायम असते. मित्रमैत्रिणींनी एकमेकांना समजून घ्यायचे असते. त्यात फक्त कट्टीबट्टी सुरू राहते, असा संदेश ‘कट्टीबट्टी’मधून देण्यात आला आहे. वर्गाचा मॉनिटर होण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो; मात्र त्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना जे आपल्याकडे अधिक आहे, ते देण्याचा सल्ला देतात आणि मग स्पर्धा सुरू होते. कोणी पैसे, कपडे, अन्न, पुस्तक, खेळणी, क्रिकेटचे साहित्य, जुने फोन, सायकल अशा वस्तू दान करतात. मात्र, आपल्याकडे असलेली विद्या, कला दुसऱ्याला देणे आणि एकाकी ज्येष्ठांना आधारासाठी वेळ देणाऱ्या मुलांना मॉनिटर बनवले जाते. वेळ आणि विद्यादान, हे आजच्या काळातही फार महत्त्वाचे आहे, असा सल्ला ‘मॉनिटर’मधून दिला आहे.एखादी गोष्ट मांडण्यासाठी नाटकापेक्षा चित्रपट हे माध्यम मला प्रभावी वाटले आणि म्हणून शॉर्ट फिल्ममधून मुलांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला, असे मत तुलालवार यांनी व्यक्त केले.