उल्हासनगरात दुकानांना आग, लाखोंचा माल खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 21:13 IST2018-08-12T21:13:37+5:302018-08-12T21:13:52+5:30
कॅम्प नं-३ अमन चित्रपटगृहासमोरील परफेक्ट डिस्ट्रीबुटर दुकानासह 5 दुकानांना आग लागून लाखोंचा माल जळून खाक झाला. रविवारी परिसरातील दुकाने बंद असल्याने जीवित हानी झाली नाही.

उल्हासनगरात दुकानांना आग, लाखोंचा माल खाक
उल्हासनगर : कॅम्प नं-३ अमन चित्रपटगृहासमोरील परफेक्ट डिस्ट्रीबुटर दुकानासह 5 दुकानांना आग लागून लाखोंचा माल जळून खाक झाला. रविवारी परिसरातील दुकाने बंद असल्याने जीवित हानी झाली नाही.
उल्हासनगर अमन चित्रपटगृहासमोर इदनानी नावाच्या इसमाचे जॉन्सन अँड जॉन्सन, डेटॉल आदी वस्तू पुरविण्याची परफेक्ट डिस्ट्रीबुटर नावाची एजन्सी असून एजन्सीचे दुकान, गोदाम व तळमजल्यावर कार्यालय आहे. त्या बाजूलाच इतर दुकाने आहेत. सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दुकानातून धूर निघू लागल्याने, नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्यालयाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वी आगीने उग्ररूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानां दीड तास लागला.
रविवारी परिसरातील दुकाने व इतर व्यवहार बंद असल्याने, मोठी जीवित हानी टळली. मात्र आगीत 5 दुकाने, गोदाम, एजन्सी कार्यालयातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे, बोलले जात आहे .