धक्कादायक! आईशी झालेल्या भांडणातून ठाण्यात तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 13:59 IST2020-10-21T23:21:11+5:302020-10-22T13:59:27+5:30
Suicide : क्षुल्लक कारणावरुन आई आणि बहिणीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून आकाश राजू पारधी (२५) या तरुणाने कोलशेत खाडीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.

धक्कादायक! आईशी झालेल्या भांडणातून ठाण्यात तरुणाची आत्महत्या
ठाणे : आई आणि बहिणीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून आकाश राजू पारधी (२५) या तरुणाने कोलशेत खाडीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले.
बुधवारी कोलशेत खाडीत आकाशचा मृतदेह काही स्थानिकांना आढळून आला. सुरुवातीला खाडी किनारी एक अनोळखी मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. ही माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांसहठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला. दुपारपर्यंत त्याची ओळख पटली नव्हती. नंतर तो मृतदेह आकाशचा असल्याचे त्याची बहिण भावना पाटील (२५) यांनी पोलिसांना सांगितले. त्याला दारुचे व्यवसन होते. तो कोणताही कामधंदा करीत नव्हता. क्षुल्लक कारणावरुन आई आणि बहिणीबरोबर झालेल्या भांडणातून तो दोन दिवसांपूर्वीच घराबाहेर पडला होता. याच रागातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.