धक्कादायक! कौटूंबिक वादातून डोक्यात हातोडयाने प्रहार करुन पत्नीची हत्या: पती पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 01:01 IST2021-07-26T00:56:48+5:302021-07-26T01:01:57+5:30

कौटूंबिक वादातून पत्नी माधूरी हिच्या (३१) डोक्यात हातोडयाने प्रहार करुन तिचा खून केल्यानंतर संजय हेमराज पाटील (३९) हा पसार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

Shocking! Wife stabbed to death in head over family dispute: Husband passes away | धक्कादायक! कौटूंबिक वादातून डोक्यात हातोडयाने प्रहार करुन पत्नीची हत्या: पती पसार

शेजाऱ्यांकडे  ठेवले सहा वर्षांच्या मुलीला

ठळक मुद्दे कळव्यातील धक्कादायक घटनाशेजाऱ्यांकडे  ठेवले सहा वर्षांच्या मुलीला

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कौटूंबिक वादातून पत्नी माधूरी हिच्या (३१) डोक्यात हातोडयाने प्रहार करुन तिचा खून केल्यानंतर संजय हेमराज पाटील (३९) हा पसार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हत्येनंतर सहा वर्षांच्या मुलीला शेजाऱ्यांकडे ठेवून पसार झालेल्या या पतीचा कळवा पोलीस शोध घेत आहेत.
संजय कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्याला कर्जही झाले होते. त्याने काही जणांची फसवणूकही केल्याने त्याच्याविरुद्ध नौपाडा आणि वागळे इस्टेट या दोन पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूकीचे गुन्हेही दाखल आहेत. दरम्यान, घरातील क्षुल्लक बाबींवरुन या दाम्पत्यांमध्ये नेहमीच खटके उडत होते. २३ जुलै रोजी सायंकाळी ६ ते २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यात असाच वाद झाला. याच वादातून त्याने माधूरीच्या डोक्यात हातोडयाने प्रहार करून तिची हत्या केली. हा प्रकार कळवा येथील सुकुर पार्क येथील इमारतीमधील दुसºया मजल्यावरील त्यांच्या घरात घडला. माधुरीशी कोणताही संपर्क होत नसल्यामुळे तिचे दीर तसेच तिचे चुलते त्यांच्या घरी २४ जुलै रोजी सायंकाळी पोहचले. त्यावेळी हा प्रकार समोर आला. या हत्येनंतर त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला त्याने बाहेर खाण्यासाठी नेले. त्यानंतर तिला शेजाºयांकडे ठेवून तो मोबाईल बंद करुन पसार झाला. आईच्या तोंडावर उशी होती आणि बाजूला रक्त उडाले होते. इतकीच तोडकी माहिती या मुलीने पोलिसांना आणि तिच्या नातेवाईकांना दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
माधुरीच्या डोक्यात हातोडयाने प्रहार केल्यानंतर पती संजयने पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात तसेच सोडून तो पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कळवा पोलिसांनी संजय पाटील याच्याविरुद्ध पत्नीच्या हत्येचा गुन्हा २५ जुलै रोजी दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. गोंटे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
* माहेरुनही घेतले दोन लाख रुपये-
संजय बेरोजगार तर पत्नी एका ब्युटी पार्लरमध्ये कामाला जात होती. त्याने काही दिवसांपूर्वी तिच्या माहेरुन दोन लाख रुपये देखील घेतले होते, अशी माहिती तिच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांना दिली आहे.

Web Title: Shocking! Wife stabbed to death in head over family dispute: Husband passes away