शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

धक्कादायक! ठाण्यात परेरानगरमध्ये गावठी दारुची तस्करी: एकाची धरपकड

By जितेंद्र कालेकर | Published: June 04, 2020 10:02 PM

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीला ठाण्यात अजूनही बंदी आहे. तर दुसरीकडे चक्क कंटेनमेंट झोन असलेल्या परेरानगर भागातच दारुची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून गावठी दारुसह कारही जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२७० बाटल्यांमधील गावठी दारु जप्तवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील परेरानगरमध्ये एका कारमधून गावठी दारुची तस्करी करणारे दोघेजण गस्तीवरील पोलिसांना पाहून पसार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या कारमधून २७० बाटल्यांमधील गावठी दारुसह कार जप्त करण्यात केली असून आकाश वीर (२२) याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्तकनगर भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे पोलीस हवालदार किशोर गायकवाड आणि राहूल थोपे हे त्यांच्या पथकासह ४ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गस्त घालीत होते. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी लोकमान्यनगरचा पाडा क्रमांक तीन हा परिसर ठाणे महापालिकेने कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे या भागात परेरानगर परिसरात लाकडी बांबूंचे बॅरिकेटस लावण्यात आलेले आहेत. गावठी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या या दोघांनी वर्तकनगर पोलिसांच्या पथकाला पाहिले. पोलीस आपल्या वाहनाची तपासणी करतील या भीतीनेच या दारु तस्करांनी तिथून पलायन केले. चौकशीत या गाडीचा चालक आकाश वीर याला ताब्यात घेतले. त्याला बेकायदेशीर दारु वाहतूक केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. या कारमधून ९० एमएलच्या २७० गावठी दारुच्या बॉटल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. हा माल कोणी आणि कोणाकडून आणला होता, याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदी