धक्कादायक! स्मार्ट सिटी कंपनीचा दिवसाला तब्बल एक लाख ३७ हजारांचा प्रशासकीय खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 01:03 AM2020-10-05T01:03:01+5:302020-10-05T01:06:57+5:30

स्मार्ट सिटी कंपनीवर दिवसाला सुमारे एक लाख ३७ हजारांचा प्रशासकीय खर्च होत आहे. या कंपनीत महापालिकेचेच अधिकारी-कर्मचारी काम करीत आहेत. तरीही गेल्या साडेतीन वर्षांत प्रशासकीय खर्चावर तब्बल १७ कोटी ५७ लाख ७८ हजार ८६ रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे या खर्चाच्या चौकशीची मागणी ठाणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

Shocking! Smart City Company's administrative expenses of one lakh 37 thousand per day | धक्कादायक! स्मार्ट सिटी कंपनीचा दिवसाला तब्बल एक लाख ३७ हजारांचा प्रशासकीय खर्च

भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांचा आरोप

Next
ठळक मुद्दे भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांचा आरोपचौकशीची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे स्मार्ट सिटी कंपनीकडून उभारण्यात येणारे बहूसंख्य प्रकल्प रखडले असतानाच स्मार्ट सिटी कंपनीवर दिवसाला सुमारे एक लाख ३७ हजारांचा प्रशासकीय खर्च होत आहे. या कंपनीत महापालिकेचेच अधिकारी-कर्मचारी काम करीत आहेत. तरीही गेल्या साडेतीन वर्षांत प्रशासकीय खर्चावर तब्बल १७ कोटी ५७ लाख ७८ हजार ८६ रुपये खर्च झाले आहेत. या प्रशासकीय खर्चाच्या चौकशीची मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.
ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाला २०१६-१७ पासून सुरूवात झाली. केंद्र आणि राज्य सरकारकडून २३ मार्च २०१७ रोजी ९० कोटी रु पये पाठविण्यात आले. त्यानंतर २०१७-१८ पासून स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रशासकीय कारभाराला सुरु वात झाली. त्यानुसार २०१७-१८ मध्ये चार कोटी ८८ लाख ८७ हजार ४६, २०१८-१९ मध्ये सात कोटी १६ लाख १४ हजार ४९०, २०१९-२० मध्ये चार कोटी ६४ लाख ९९ हजार ३११ आणि १ एप्रिल २०२० ते २९ सप्टेंबर २०२० दरम्यान ८७ लाख ७७ हजार २३९ रु पये असा गेल्या साडेतीन वर्षांत १७ कोटी ५७ लाख ७८ हजार ८६ रु पये खर्च झाला आहे. या खर्चाचा हिशोब केल्यास तिजोरीतून दररोज एक लाख ३७ हजार ५४१ रु पयांचा खर्च होत आहे. स्मार्ट सिटी कंपनीत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. सर्व प्रकल्पांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. महापालिका मुख्यालयातूनच कंपनीचा कारभार सुरू आहे. अशा परिस्थितीत एवढा मोठा प्रशासकीय खर्च कसा, असा सवालही पवार यांनी केला आहे. या प्रशासकीय खर्चात कोणकोणते खर्च केले, कोणाला मानधन वा पगार दिला जात आहे का, याबाबत चौकशीची मागणीही पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. सुमारे १७ कोटी ५७ लाखांमधून ठाणे शहरात नक्की एखादा लोककल्याणकारी प्रकल्प साकारता आला असता, असेही पवार यांनी म्हटले आहे.
----------------
कामे ठप्प तरीही खर्च ८७ लाख
कोरोना आपत्तीमुळे २५ मार्चनंतर जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात कामे ठप्प झाली होती. तर कोरोनामुळे स्मार्ट सिटी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभाही डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली. मात्र, १ एप्रिल ते २९ सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय खर्च ८८ लाख
रुपये झाला, याबद्दलही पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

Web Title: Shocking! Smart City Company's administrative expenses of one lakh 37 thousand per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.