धक्कादायक! एसटीच्या धडकेने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 23:43 IST2021-08-09T23:42:35+5:302021-08-09T23:43:37+5:30
एसटी बसचा धक्का लागल्याने मोटारसायकलीवरुन जाणाऱ्या २१ वर्षीय शुभम भाबल याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घोडबंदर रोडवर घडली.

चालकाविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एसटी बसचा धक्का लागल्याने मोटारसायकलीवरुन जाणाऱ्या २१ वर्षीय शुभम भाबल याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घोडबंदर रोडवर घडली. याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास ठाण्याकडून घोडबंदर रोड मार्गावरुन दोस्ती एमएमआरडीए बिल्डिंगचे समोरुन मानपाडा येथे शुभमच्या दुचाकीला एसटीचा धक्का लागला. या अपघातामध्ये तो खाली पडल्याने एसटीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अज्ञात एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पी. जे. सुरवाडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.