धक्कादायक! बाबू नाडार खूनी हल्ला प्रकरणातील तरुणाची ठाण्यात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 20:41 IST2021-03-30T20:39:13+5:302021-03-30T20:41:59+5:30
ठाण्यातील कुख्यात मटका किंग बाबू नाडार याच्यावर काही दिवसांपूर्वी खूनी हल्ला करणाऱ्या स्वप्निल उर्फ बॉबी उमेश तेलूरे (१७, रा. कोपरी कॉलनी, ठाणे) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास मृत्यु झाला.

नशेमध्ये आत्महत्या केल्याचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील कुख्यात मटका किंग बाबू नाडार याच्यावर काही दिवसांपूर्वी खूनी हल्ला करणाऱ्या स्वप्निल उर्फ बॉबी उमेश तेलूरे (१७, रा. कोपरी कॉलनी, ठाणे) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास मृत्यु झाला. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरी कॉलनीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चाळीमध्ये राहणाºया स्वप्निल याने २९ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराजवळील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूस असलेल्या विलास म्हात्रे यांच्या घरातील गॅलरीतील लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच कुटूंबियांनी त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गंभीर प्रकृती असलेल्या स्वप्निलचा उपचारादरम्यान ३० मार्च रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. काही दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरुन मटका किंग बाबू नाडार याच्यावर स्वप्निल सह त्याच्या इतर दोन भावांनीही चाकूचे वार करुन खूनी हल्ला केला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. अनेक दिवस रुग्णालयात उपचारानंतर तो घरी परतला. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन लढा द्यावा लागेल, अशी भीती स्वप्निल याला होती. तो नशेच्याही आहारी गेल्यामुळे त्यातूनच त्याने ही आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.