शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

धक्कादायक! कॅन्सरवरील औषध मिळविण्याच्या नावाखाली अमेरिकन महिलेने केली २२ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 1:28 AM

इन्स्टाग्रामवर एका अमेरिकन महिलेशी मैत्री करणे ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील ५२ वर्षीय उच्च पदस्थ अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. ब्रिस्ट कॅन्सर या आजारावरील बिया भारतातून पाठविण्याच्या नावाखाली त्याची तब्बल या महिलेने २२ लाख ७८ हजारांची आॅनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी या महिलेसह पाच जणांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे फॉरेनर महिलेशी मैेत्री करणे एका ठाणेकराला पडले महागातअमेरिकन महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उत्सुकतेपोटी इन्स्टाग्रामवर एका अमेरिकन महिलेशी मैत्री करणे ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील ५२ वर्षीय रहिवाशाला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेने स्तनाचा कर्करोग (ब्रिस्ट कॅन्सर ) या आजारावरील बिया भारतातून पाठविण्याच्या नावाखाली त्याची तब्बल २२ लाख ७८ हजारांची आॅनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी या महिलेसह पाच जणांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी मंगळवारी दिली.ठाण्यातील माजिवाडा भागातील एका नामांकित गृहसंकुलामध्ये दीपक शर्मा (नावात बदल) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. एका मोठ्या खासगी कंपनीमध्ये ते उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांची इन्स्टाग्राम या सोशल साईटवर १४ मे २०२० रोजी लॉरा डॉरा नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांच्यात चांगली मैत्रीही झाली. पुढे तिने तिचा व्हॉटसअ‍ॅप क्रमांकही त्यांना दिला. आपण अमेरिकेत वास्तव्याला असून एका खाजगी कंपनीत सेक्र ेटरीपदावर नोकरी करीत असल्याची तिने शर्मा यांना बतावणी केली.अमेरिकेतील एक औषध कंपनी ब्रिस्ट कँन्सर या आजारावर औषध तयार करते. त्या औषधासाठी लागणाºया बिया (सिड्स) या भारतात खूप अल्प दरामध्ये उपलब्ध होतात. अमेरिकेत त्यांची किंमत जास्त आहे. आपली एक नातेवाईक महिला एका फार्मसी कंपनीमध्ये नोकरीला असून ती या बिया तुमच्याकडून खरेदी करील. त्यातून आपल्या दोघांनाही मोठा फायदा होऊ शकतो, अशीही तिने त्यांना बतावणी केली. त्यानंतर तिने त्यांना दिल्लीतील एका दलालाचा मोबाइल क्र मांक दिला. हा दलाल तुम्हाला बियांचे सॅम्पल पाठवेल ते सॅम्पल अमेरिकेच्या दलालाकडे पाठवा, असेही तिने त्यांना बजावले.आपल्याला चांगला फायदा होईल या भाबडया आशेपोटी शर्मा यांनी या दलालाच्या मोबाईलवर संपर्क करुन बियांचे सॅम्पल मागविले. तीन सॅम्पलची किंमत दोन लाख २५ हजार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. आधी आॅनलाईन पेमेंट करा, मगच बिया तुम्हाला अगदी घरपोच मिळतील, असेही सांगण्यात आले. नंतर शर्मा यांनी या दलालाने दिलेल्या बँक खात्यावर सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम आॅनलाईन पाठविली. मात्र, बरेच दिवस उलटूनही बियांचे सॅम्पल आले नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता, संबंधित कंपनीला तीन नव्हे तर दहा पाकिटांची गरज असल्यांचे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना वेगवेगळे बँक खाते क्र मांक देऊन पेमेंट करण्यास सांगण्यात आले. मोठी आॅर्डरमुळे शर्मा यांनी वेगवेगळ्या खात्यांवर २२ लाख ७८ हजार रु पये आॅनलाईन जमा केले. मात्र, बियांची डिलिव्हरी त्यांच्या घरापर्यंत पोहचलीच नाही. त्यानंतर लारा डोरा हिच्यासह सर्वांचे फोन बंद झाले होते.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइन