शाळेची फी भरण्यासाठी पालकांना सक्ती केल्यास शिवसेनेनं दिला आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 04:26 PM2020-10-13T16:26:31+5:302020-10-13T22:42:13+5:30

नगरसेवकाने विचारला जाब

Shiv Sena warns of agitation if parents are forced to pay school fees | शाळेची फी भरण्यासाठी पालकांना सक्ती केल्यास शिवसेनेनं दिला आंदोलनाचा इशारा

शाळेची फी भरण्यासाठी पालकांना सक्ती केल्यास शिवसेनेनं दिला आंदोलनाचा इशारा

googlenewsNext

कल्याण- कल्याण पूव्रेतील विजयनगर परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या सेंट थॉमस शाळेकडून विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी पालकांना सक्ती केली जात आहे. लॉकडाऊनमुळे पालकांच्या हाती पैसा नाही. ते कुठून भरणार इतकी फी असा सवाल उपस्थित करीत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी फी साठी सक्ती केल्यास शिवसेना स्टाईलने शाळेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

शाळा सुरु झाल्यावर पालकांकडून विद्यार्थ्यांची फी घ्या असे सरकारच्या शिक्षण खात्याचे आदेश आहेत. शाळा बंद असून शाळांकडून विद्याथ्र्याना ऑनलाईन धडे दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षण असताना सेंट थॉमस शाळेकडून पालकांकडे फी भरण्याची मागणी केली जात आहे. शाळा सुरु असताना एका विद्यार्थ्यांकडून १९ हजार रुपये फी घेतली जात होती. लॉकडाऊनमुळे पालकांच्या हाती पैसा नाही. अनेक पालकांचे रोजगार गेले आहे. तसेच काही पालकांची पगार कपात झाली आहे. त्यात घराच्या कर्जाचे हप्ते, घरभाडे याचा खर्च आहे. हे सर्व थकले असताना फी कुठून भरायची असा प्रश्न आहे.

शाळेकडून फी भरण्याकरीता सक्ती केली जात असल्याने पालकांनी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे दाद मागितली. नगरसेवक गायकवाड यांनी पालकांसह शाळेत घाव घेतली. शाळेच्या फी काऊंडवर जाऊन. पालकांकडे फीसाठी सक्ती का केली जात आहे. सक्ती करु नका. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शाळा व्यवस्थापनास दिला आहे. शाळा व्यवस्थापनातील एकही जबाबदार व्यक्ती गायकवाड यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आला नाही. या प्रकरणी शाळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.

Web Title: Shiv Sena warns of agitation if parents are forced to pay school fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.