शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात पुन्हा भाजपला चितपट करण्यास शिवसेना सज्ज?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 23:54 IST

महापालिका विशेष समिती सभापतिपदासाठी चढाओढ : बहुमत असूनही ओमी कलानी यांच्या मदतीने देणार धक्का

सदानंद नाईकलोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेनेने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपला धोबीपछाड दिल्यानंतर आता विशेष समिती सभापतिपदाची निवडणूक ९ मार्चला होणार असून, शिवसेना पुन्हा भाजपला चितपट करण्याकरिता सिद्ध झाली आहे.

उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना भाजपतील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवकांच्या मदतीने शिवसेना आघाडीने महापौर, उपमहापौर पदासह स्थायी समिती सभापती व विशेष समिती सभापतीपद भाजपकडून हिसकावून घेतले. महापालिका सार्वत्रिक निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली असून, त्यापूर्वी भाजपला विशेष समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत धक्का देण्याची रणनीती राज्यातील सत्ताधारी आघाडीतील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, उपशहरप्रमुख अरुण अशान, राष्ट्रवादीचे गटनेता व सभागृहनेते भारत गंगोत्री आखत आहेत. एकूण नऊ विशेष समिती सभापती पदासाठी ४ मार्च रोजी अर्ज भरण्याची तारीख असून, ९ मार्च रोजी सभापतिपदाची निवडणूक होणार आहे.महापालिकेच्या सत्ताधारी आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आठवले गट आदी पक्ष सहभागी आहेत. 

विशेष समितीच्या एकूण नऊ सदस्यांपैकी भाजपचे पाच, शिवसेना, रिपाइं व राष्ट्रवादी पक्षाचे चार सदस्य आहेत. विशेष समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असले, तरी सर्वच सभापती पदे हिसकावून आणण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते रणनीती आखत आहेत. 

nभाजपच्या शहराध्यक्षपदी जमनुदास पुरस्वानी यांची निवड झाली. तेव्हापासून भाजपला पराभवाचे धक्के बसत असून, विशेष समिती सभापतिपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. nशिवसेना, ओमी कलानी टीमचे बंडखोर नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीआरपी आदी पक्षांकडे विशेष समितीची सभापतिपदे जाण्याची शक्यता असून, त्यांच्यामध्ये सभापतिपदांकरिता चढाओढ आहे.