अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला यश, भाजपाला जबर झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 12:30 IST2017-12-14T12:29:25+5:302017-12-14T12:30:29+5:30
अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला जबर धक्का बसला आहे. अंबरनाथ पंचायत समितीवर भगवा फडकला आहे.

अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला यश, भाजपाला जबर झटका
ठाणे - अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला जबर धक्का बसला आहे. अंबरनाथ पंचायत समितीवर भगवा फडकला आहे. आठ पैकी सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने जिंकल्या. शिवसेनेला चार तर राष्ट्रवादीला दोन जागांवर विजय मिळाला. भाजपाने पंचायत समितीमध्ये खातेही उघडले नाही.
खरतर राज्यात भाजपा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र आहे. पण अंबरनाथ पंचायत समितीमध्ये भाजपाला शह देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढवली. त्याचा त्यांना फायदाही झाले.
अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागा आहेत. त्यातील दोन जागांवर शिवसेना एका जागेवर भाजपाला विजय मिळाला. अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वाडी गटातून शिवसेनेच्या सुवर्णा राऊत विजयी झाल्या.