शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

निर्णायक आघाडी मिळताच शिवसैनिकांनी घेतली आनंदाश्रमाकडे धाव, आनंद दिघे यांच्या चरणी वाहिला विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 1:37 AM

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या शिवसेनेच्या राजन विचारे यांनी दुपारी ३ पर्यंत झालेल्या आठव्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली.

- जितेंद्र कालेकरठाणे  - मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या शिवसेनेच्या राजन विचारे यांनी दुपारी ३ पर्यंत झालेल्या आठव्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. तर, दुसरीकडे विचारे यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेऊन विजयापूर्वीच जल्लोष साजरा केला. टेंभीनाक्यावरील आनंदाश्रमासमोर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुरुवारी निकालापूर्वीच ‘आनंदोत्सव’ साजरा केला.ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला घोडबंदर रोडवरील कासारवडवली, आनंदनगर येथील न्यू होरायझन स्कूलमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून प्रारंभ झाला. सुरुवातीला शिवसेना, भाजप युतीबरोबरच काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्येही जल्लोषाचे वातावरण होते. पहिल्याच फेरीत शिवसेनेच्या विचारे यांनी २४ हजार ३०१ मते घेतली. तर, राष्टÑवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांना ११ हजार ८२१ मते मिळाली. पहिल्याच फेरीमध्ये विचारे यांनी १२ हजार ४८० मतांची आघाडी घेतली होती. पुढे १० ते १८ व्या फेरीपर्यंतही त्यांनी ही आघाडी कायम ठेवली. अठराव्या फेरीमध्ये विचारेंना चार लाख ५६ हजार १८१ मते मिळाली. तर, परांजपे यांना एक लाख ९७ हजार २०२ मते मिळाली. यातही दोन लाख ५८ हजार ९७९ मतांची विचारेंना आघाडी मिळाली. त्यामुळे विचारेंच्या विजयावर शिक्कामोर्तब करून शिवसेनेने टेंभीनाक्यावरील आनंदाश्रमसमोर फटाक्यांची आतषबाजी करून धूमधडाक्यात जल्लोष साजरा केला. ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांना पेढा भरवत फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, ओवळा-माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, शहरप्रमुख रमेश वैती, ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, आदी उपस्थित होते.नेत्यांच्या हाती ढोल आणि बॅन्जोवर कार्यकर्ते थिरकले!कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे छोटे कटआउट हाती घेऊन, तर काहींनी मोदी यांचे मुखवटे परिधान करून वंदे मातरम्... भारत माता की जय... मोदी मोदी... अशा घोषणाही कार्यकर्ते देत जल्लोषात सहभागी झाले होते. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बॅन्जो सुरू असताना आमदार केळकर यांनी ढोल हाती घेऊन तो वाजवला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९thane-pcठाणे