शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मंगरूळ डोंगरावरील वणवा प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार शिंदे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 13:25 IST

अंबरनाथ तालुक्यातील मंगलोर या गावाजवळील डोंगरावर लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांपैकी बहुसंख्य वृक्ष हे वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत.

ठळक मुद्देअंबरनाथ तालुक्यातील मंगलोर या गावाजवळील डोंगरावर लावण्यात आलेले एक लाख वृक्षापैकी बहुसंख्य वृक्ष ही वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत.वणवा काही समाजकंटकांनी लावला असून त्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्टयातील मांगरूळ गावाजवळील डोंगरावर लावलेल्या वणव्यात दुसऱ्यांदा वनसंपदा नष्ट झाली आहे.

पंकज पाटील

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मंगलोर या गावाजवळील डोंगरावर लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांपैकी बहुसंख्य वृक्ष हे वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत. हा वणवा काही समाजकंटकांनी लावला असून त्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांनी शुक्रवारी मंगळूर येथील डोंगरावर जळालेल्या वृक्षांची पाहणी केली.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्टयातील मांगरूळ गावाजवळील डोंगरावर लावलेल्या वणव्यात दुसऱ्यांदा वनसंपदा नष्ट झाली आहे. या डोंगरावर तीन हेक्टर जागेवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले होते. गेल्यावर्षी हे वृक्ष वणव्यात सापडले होते. त्यानंतरही वन विभागाने पुन्हा ही झाडे जगविली होती. श्रीमलंग गड परिसरातील मांगरुळ या गावी वनविभागाच्या सुमारे 80 एकर जमिनीवर डॉ. शिंदे यांनी गेल्यावर्षी लोकसहभागातून एक लाख झाडे लावण्याचे महाअभियान राबवले होते. तब्बल 15 हजारहून अधिक नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अवघ्या काही तासात एक लाख झाडे लावली होती. या झाडांचे योग्य प्रकारे संगोपन व्हावे, यासाठी शिंदे यांनी या ठिकाणी स्वखर्चाने पाण्याच्या टाक्या आणि जलवाहिन्यांची व्यवस्था केली होती. मात्र वृक्षारोपण केल्यावर या वृक्षांनी मुळे धरलेले असतांनाच गेल्यावर्षी या डोंगरावर वणवा लागला. त्यात 80 टक्के वृक्ष जळाली. सुदैवाने वृक्षाभोवती असलेले सुके गवत काढण्यात आल्याने त्यातील बहुसंख्य वृक्ष वाचविण्यात वन विभागाला यश आले होते. जळालेले वृक्ष वाचविण्यासाठी खासदार शिंदे यांनीही खाजगी संस्थांची मदत घेत त्या वृक्षांचे संगोपन केले होते. 

यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा या वृक्षांची वाढ झाली होती. एक लाख वृक्षांपैकी 90 टक्के वृक्ष जिवंत ठेवण्यात यश आले होते. मात्र बुधवारी रात्री याच डोंगरावर वणवा लागल्याने त्यात अडीच हेक्टर डोंगरावरील सर्वच्या सर्व वृक्षांना झळ बसली. त्यातील काही वृक्ष पूर्ण जळाले तर काही वृक्षांना वाचविणो शक्य होणार आहे. सलग दोन वर्ष एकाच डोंगरावर वणवा लागून वृक्ष जळत असल्याने वन विभागाचे अधिकारी नियोजन करण्यात कमी पडत असल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला आहे.एकच चूक दोनवेळा झाल्याने आता खासदार शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथforestजंगलfireआगShrikant Shindeश्रीकांत शिंदे