शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेना नवी मुंबईचा वचपा ठाण्यात काढण्याच्या तयारीत, महापालिकेतील समित्यांमध्ये स्थान न देण्याची भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 06:01 IST

Thane Politics: पहिल्याच महासभेत सत्तेत असलेल्या भाजपला शिंदेसेनेने थेट विरोधी बाकावर जाण्यापर्यंत विचार करण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे.

-अजित मांडके, ठाणेनवी मुंबईत परिवहन समितीमध्ये नियमबाह्य कामकाज केल्याचा आरोप करत शिंदेसेनेने भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र त्यानंतरही भाजपकडून नवी मुंबईत शिंदेसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा वचपा शिंदेसेनेने ठाण्यात काढण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

पहिल्याच महासभेत सत्तेत असलेल्या भाजपला शिंदेसेनेने थेट विरोधी बाकावर जाण्यापर्यंत विचार करण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना स्वतंत्र लढले. तेथे शिंदेसेना विरोधी बाकावर बसली आहे. ठाण्यात दोन्ही पक्षांनी युती केली. भाजप सत्तेत सहभागी झाला. त्यांच्याकडे उपमहापौरपद आहे. इतर समित्यांवर देखील भाजपने दावा केला आहे.

...म्हणून दोघांमध्ये सामना

नवी मुंबई पालिकेत संख्याबळानुसार परिवहन समिती सदस्यांची निवड करणे अपेक्षित असताना भाजपने त्यांचेच सदस्य दिले. त्यातून भाजप विरुद्ध शिंदेसेना सामना रंगला आहे. त्याचे पडसाद ठाण्यातही पडू लागले आहेत.

प्रशासनाच्या काळातील कारभाराबाबत विचारलेल्या प्रश्नांवर महासभेत उत्तर मिळण्याची भाजपला अपेक्षा होती. मात्र, त्यांची मागणी फेटाळण्यात आली. तसेच पक्षाचे जोडे बाहेर काढून यावेत, अशी अप्रत्यक्ष टीकाही शिंदेसेनेने भाजपवर केली.

इतर समित्यांमध्ये स्थान मिळणार नाही?

नवी मुंबईत परिवहन समिती सदस्यांच्या निवडीबाबत भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका ठाण्यात शिंदेसेनेकडून घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठाणे महापालिकेत स्थायी समिती सदस्यांसह, विषय समित्या, प्रभाग समित्या, परिवहन, वृक्ष प्राधिकरण, शिक्षण समिती सदस्य निवडीची प्रक्रिया अजून बाकी आहे.

नवी मुंबईत भाजपने भूमिका २ न बदलल्यास ठाण्यातही भाजपला इतर समित्यांमधील वाटा विसरावा लागेल, अशी भूमिका शिंदेसेनेने घेतल्याची चर्चा आहे. 

सत्तेत राहून भाजपची चौकीदाराची भूमिका असेल तर इतर समित्यांमध्येही स्थान न देण्याचा निर्णय शिंदेसेना घेऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena Retaliates Against BJP in Thane Over Navi Mumbai Snub.

Web Summary : Shinde Sena threatens to exclude BJP from Thane committees, retaliating against alleged BJP actions in Navi Mumbai. Tensions rise between the allies.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका