शिंदेसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आपसात भिडले; उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीनंतर राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 23:44 IST2026-01-12T23:41:37+5:302026-01-12T23:44:12+5:30
अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची आणि स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयाचा जल्लोष करताना शिंदे सेना आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले आणि मोठा राडा झाला.

शिंदेसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आपसात भिडले; उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीनंतर राडा
अंबरनाथ: अंबरनाथमध्ये उपनगरअध्यक्ष पदाची निवडणूक पार पडल्यानंतर तीन स्वीकृत नगरसेवक पदावर बाजी मारणाऱ्या भाजपाने जल्लोष केला तर यावेळी उपनगराध्यक्षच्या उमेदवाराचा जल्लोष करण्यासाठी शिंदे सेनेचे कार्यकर्ते जमले होते. यावेळी शिंदेसेना आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले.
अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची आणि स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयाचा जल्लोष करताना शिंदे सेना आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले आणि मोठा राडा झाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पळवून लावले. अंबरनाथ मध्ये शिंदे सेना आणि भाजपा यांच्यात पेटलेला वाद हे या राड्याचे कारण ठरले.
स्वीकृत नगरसेवक पदी तीन नगरसेवक निवडून आल्यानंतर भाजपाने जल्लोष केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जात असताना नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ शिंदे सेनेचे कार्यकर्ते जमले होते यावेळी एकमेकांवर घोषणाबाजी करीत असताना राडा झाला आणि भाजपाचे कार्यकर्ते शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. लागलीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला.