शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

ठाणे पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्त्याने दिला निराश्रिताला निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 11:30 PM

गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यातील सेवा रस्त्यावर आश्रय घेतलेल्या एका फिरस्त्याला नौपाडा पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्त्याने कर्जतच्या पुनर्वसन केंद्रामध्ये निवारा मिळवून दिला.

ठळक मुद्देसेवा रस्त्यावर घेतला होता आश्रयफिरस्त्याला ‘खाकी’नेही दिला माणूसकीचा हातकर्जतच्या पुनर्वसन केंद्रात झाली रवानगी

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पूर्व द्रुतगती मार्गावरील सेवारस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उघड्यावरच वास्तव्य करणाऱ्या हरिश्चंद्र रघुनाथ गवारे (५०) या निराश्रिताला नौपाडा पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते बी. अल्बर्ट दयाकर (७१) यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे बुधवारी निवारा दिला. पोलीस आणि या सामाजिक कार्यकर्त्यामुळे एका सामाजिक संस्थेत आश्रय मिळाल्यामुळे गवारे यांच्या चेह-यावर हास्य फुलले.पूर्व द्रुतगती मार्गावरील नौपाड्यातील ‘शनया’ हॉलच्या समोर गवारे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून उघड्यावरच निवारा शोधला होता. त्यांच्याकडे दयाकर यांनी विचारपूस केली, तेव्हा त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांनी सांगितले. मुले किंवा पत्नीही नसल्याचे त्यांनी सांगितले. दयाकर यांनी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव यांना ही माहिती दिली. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील श्रद्धा रिहॅबिलेशन फाउंडेशन सेंटर या पुनर्वसन केंद्राला या निराश्रित फिरस्त्याची माहिती देऊन त्याला या केंद्रात आश्रय देण्याची केंद्राच्या व्यवस्थापकांना ८ मे रोजी पत्राद्वारे विनंती केली. गवारे हे बेघर आणि बेवारस असल्यामुळे त्यांना संरक्षण आणि काळजीची गरज असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले. या पत्राची दखल घेऊन या केंद्राने गवारे यांना आपल्या पुनर्वसन केंद्रात आश्रय देण्याचे तत्काळ मान्य केले. त्यानुसार, ओऊळकर यांच्या पथकाने त्याची एका खासगी वाहनाने बुधवारी वाणगाव व्हिलेजमधील श्रद्धा रिहॅबिलेशन फाउंडेशन केंद्रामध्ये रवानगी केली. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आपल्याला हक्काचा निवारा मिळाल्यामुळे गवारे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

‘‘गेल्या अनेक दिवसांपासून सेवारस्त्यावर हरिश्चंद्र गवारे या फिरस्त्याने उघड्यावरच आश्रय घेतला होता. आपल्याला कोणाचाच आश्रय नसल्यामुळे इच्छामरण मिळावे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली होती. दयाकर यांनी त्याची काळजी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी पदरमोड करून त्याला कर्जत येथील पुनर्वसन केंद्रात सोडवण्याची व्यवस्था केली.’’चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसSocialसामाजिक