वंचित समाजघटकांना ‘खाकी’ ने दिला मायेचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:25 AM2017-10-25T00:25:25+5:302017-10-25T00:25:36+5:30

गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याशिवाय पोलीस काही करत नाही, असा समज आजही आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनातील काही घटक कारणीभूत असू शकतात.

'Khaki' gave his hand to the deprived community groups | वंचित समाजघटकांना ‘खाकी’ ने दिला मायेचा हात

वंचित समाजघटकांना ‘खाकी’ ने दिला मायेचा हात

Next
ठळक मुद्देसफाई कामगार भारावले : भेटवस्तू देऊन सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर: गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याशिवाय पोलीस काही करत नाही, असा समज आजही आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनातील काही घटक कारणीभूत असू शकतात. मात्र, खाकी वर्दीतही संवेदना आणि सामाजिक बांधिलकी जोपासू शकतात, हे चिमूर पोलिसांनी सिद्ध केले. ठाणेदार दिनेश लबडे यांच्या पुढाकारात स्वच्छता कामगारांच्या कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम राबून त्यांना मायेचा हात दिला आहे.
पोलिसांना दया-माया नसते. गुन्हेगारांचा कर्दनकाळ हीच प्रतिमा समाजासमोर आहे. मात्र खाकी वर्दीतही संवेदनशील माणूस दडलेला असतो. याची प्रचिती शहरातील पोलीस ठाण्यात आली. सर्व सामान्य नागरिकांत पोलिंसाप्रती आजही नकारात्मक दृष्टी आहे. ही प्रतिमा बदलविण्यासाठी ठाणेदार दिनेश लबडे यांनी शहरातील स्वच्छता कामगारांच्या कुटुंंबासोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. कारण या कामगारांच्या कार्यामुळेच शहर निरोगी राहते. त्यामुळे या वंचित बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यातील न्युनगंड दूर करण्यासाठी दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. स्वच्छता कर्मवारी समाजासाठी महत्वाचे कार्य करतात. त्यांच्या या कार्याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली. आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून ठाणेदार दिनेश लबडे यांनी पोलीस ठाण्यात समाजातील स्वच्छतेचे काम करणाºया सफाई कामगारांना दिवाळीनिमित्त या कामगारांना टॉवेल व मिठाई भेट देवून दिवाळी वंचित घटकांचा सत्कार केला. कायदा व सुव्यवस्थेचे काम पाहत असताना हा नाविण्यपूर्व उपक्रम राबविल्याने शहरातील नागरिकांनी कौतुक केले. नगरसेवक उमेश हिंगे, पत्रकार रामदास हेमके, फिरोज पठाण, नागेश चट्टे, सुधाकर माकोडे, वासु टेकाम, सुधाकर घाटे, दगडू आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रत्येक उत्सवामध्ये पोलीस शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी कर्तव्य बजावतात. त्यामुळे बरेच सण परिवारासोबत साजरा करता येत नाही. कायदा व सुव्यस्था सांभाळताना आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेनेतून सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम आम्ही राबविला.
- दिनेश लबडे, ठाणेदार

Web Title: 'Khaki' gave his hand to the deprived community groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.