नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावर शरद पवारांच्या खासदाराचा बहिष्कार; बाळ्या मामा यांची मागणी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:19 IST2025-10-08T13:17:24+5:302025-10-08T13:19:01+5:30
Navi Mumbai Airport News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळू मामा यांनी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावर शरद पवारांच्या खासदाराचा बहिष्कार; बाळ्या मामा यांची मागणी काय?
भिवंडी: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या उद्घाटन सोहळ्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बहिष्कार घातला आहे.
'जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तोपर्यंत स्थानिक भूमिपुत्र उद्घाटन सोहळे व आनंदोत्सव साजरे करणार नाही, अशी भूमिका स्थानिक भूमीपुत्रांनी घेतली आहे. त्यामुळे आजच्या उदघाटन सोहळ्याला मी उपस्थित राहणार नाही', असे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.
नवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असून, या कार्यक्रमाला शरद पवार यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आहे. ८ ऑक्टोबरला लोकार्पण झाल्यानंतर डिसेंबरपासून या विमानतळावरून हवाई सेवा सुरू होणार आहे.