शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

छाया रुग्णालय व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:28 AM

अपुरे मनुष्यबळ : रुग्णांना सेवा देण्यात येत आहेत अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : येथील छाया रुग्णालयात केवळ दोन डॉक्टर व जेमतेम सहा कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे अपुरे मनुष्यबळ आणि साधनसामग्रीमुळे सेवा देताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.कोरोनाकाळात वैद्यकीय सेवेवर परिणाम होत असताना कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोजकीच रुग्णालये पुढे येत आहेत. त्यातच गोरगरीब नागरिकांसाठी छाया रुग्णालय हे आधार होते. मात्र, सध्या या रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. रुग्णालयात वैद्यकीय सेवकांचा अभाव असल्याने तेथे पूर्ण क्षमतेने काम करणे अवघड जात आहे.सरकारी रुग्णालय असलेल्या छाया रुग्णालयात अधीक्षक डॉ. शशिकांत डोडे व डॉ. सचिन देशमुख हे दोनच डॉक्टर उपलब्ध आहेत. सरकारकडे सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची वारंवार मागणी केल्यानंतर डॉ. सुनील घाटकर, डॉ. शुभांगी वडेकर, डॉ. सचिन देशमुख, डॉ. योगेश पाल, डॉ. विक्रांत गुजर या पाच जणांची नियुक्ती केली. मात्र, काही महिन्यांपूर्वी डॉ. वडेकर यांची कोविड रुग्णालय, अंबरनाथ, पाल यांची जिल्हा रुग्णालय ठाणे, विक्रांत गुजर यांची मुरबाड ग्रामीण रुग्णालय येथे बदली झाली. तर, डॉ. घाटकर हे आजारी असून ते उपचार घेत आहेत.इमारत झाली धोकादायक; राज्य सरकारचे होतेय दुर्लक्ष५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले रुग्णालय गेल्या २८ वर्षांपासून व्हेंटिलेटरवर आहे. डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांची कमतरता, रुग्णालयातील संगणक बंद आहेत. शस्त्रक्रियागृह, शवविच्छेदनगृह, रुग्णवाहिका, जीर्ण झालेली धोकादायक इमारत अशा अनेक समस्यांकडे राज्य सरकार, अंबरनाथ नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याने सर्वसामान्य व गोरगरीब नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. अशा परिस्थितीत पुरुष, महिला, आयसोलेशन, प्रसूती, इम्युलायझेशन, ओपीडी, अपघात हे सर्व विभाग दोन डॉक्टर व सहा कर्मचारी यांना बघावे लागत आहे.छाया रुग्णालयात पुरेसे डॉक्टर आहेत, मात्र कोविडमुळे काही डॉक्टरांची बदली करण्यात आली आहे. मात्र, बदलापूर येथून नुकतीच एका डॉक्टरची नियुक्ती छाया रुग्णालयात केली आहे. चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाºयांची नियुक्ती लवकरात लवकर केली जाईल.- डॉ. कैलास पवार,ठाणे जिल्हा आरोग्य संचालक