शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

ठाणे महानगरपालिका सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचे दिवा भाजपाने घातले श्राद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 2:36 PM

दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता दिवा भाजपने श्राद्ध घालून निषेध केला.

ठाणे: दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता दिवा भाजपने श्राद्ध घालून निषेध केला.यावेळी भाजपचे दिवा सरचिटणीस रोहिदास मुंडे,अंकुश मढवी,नरेश कदम यांनी मुंडन करून मुंब्रा देवी कॉलनी रोडच्या कामात अनियमितता असल्याचा आरोप केला.

मुंब्रा देवी कॉलनी रोडसाठी सुमारे 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या रस्त्याचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आले आहे.तीन महिने उलटले तरी 10 टक्के काम ही झालेले नाही.मागील पाच वर्षे हा रस्ता अक्षरशः गटार झालेले आहे.असे असताना सदर रस्ता तातडीने होणे गरजेचे आहे.निधी मंजूर आहे,वर्क ऑर्डर मिळाली आहे तरी कामात वेळ काढला जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.जे गटारांची कामे सुरू आहेत त्यात फाउंडेशन टाकले जात नाही.परिणामी पावसाळ्या त गटारे भरण्याचा धोका आहे.अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना सत्ताधारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने दिवा भाजपच्या वतीने कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड,ऍड.आदेश भगत,रोहिदास मुंडे, निलेश पाटील,रोशन भगत,अंकुश मढवी, नरेश कदम,सचिन  भोईर,गणेश भगत आदी नी मुंब्रा देवी कॉलनी येथे रस्त्याचे काम ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे तेथे ठामपा सत्ताधारी व प्रशासनाच्या नावाने श्राद्ध घालत मुंडन केले.

दिवा शहरात सत्ताधाऱ्यांची मनमानी असून नागरिकांचे हित लक्षात न घेता केवळ टेंडर साठी कामे केली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.गणेश नगर भागातील खड्डे अद्याप भरण्यात आले नसून या रस्त्याच्या कामाला सुरुवात कधी करणार असा सवाल भाजपने केला आहे.2019 च्या निवडणुकीसाठी सत्ताधारी शिवसेना दिव्यातील गरीब नागरिकांना वेठीस धरत असून जाणीव पूर्वक संथ गतीने कामे केली जात असल्याचा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे.मे महिन्याच्या आत सर्व रस्त्याची कामे पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे कल्याण ग्रामीणचे नेते शिवाजी आव्हाड यांनी दिला आहे.दिव्यतील सर्व मुख्य रस्त्याची कामे पावसाळ्या पूर्वी करा अशी मागणी ऍड आदेश भगत यांनी केली आहे. शौचालय घोटाळा, नाना नानी पार्क घोटाळा,पाणी घोटाळा यासारख्या अनेक विषयांवर सत्यधारी शिवसेनेला लक्ष करत भाजपने हे आंदोलन केले आहे.एकंदरीत दिवा भाजप आता विकास कामांच्या मुद्द्यावर आक्रमक झाली असून.शिवसेनेच्या कामांवर पहारेकरी म्हणून भूमिका बजावणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपा