लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक
By कुमार बडदे | Updated: October 11, 2022 21:16 IST2022-10-11T21:16:02+5:302022-10-11T21:16:38+5:30
या प्रकारणाची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी लोकमतला दिली.

लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक
मुंब्रा: सोशल मिडियावर पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेने, गेल्या पाच महिन्यांपासून रफिक कामदार हा कथित सहकारी आपल्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पिडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून कामदार याला पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ ऑक्टोबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकारणाची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी लोकमतला दिली. दरम्यान यापूर्वीदेखील एका पत्रकार महिलेने एका कार्यक्रमादरम्यान कामदार याने तीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली होती. अशी माहिती सूत्रानी दिली.