डोंबिवलीत बहुतांशी भागांत सात तास वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:38+5:302021-05-12T04:41:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पावसा‌ळ्यापूर्वीची कामे, तसेच देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवलीतील काही भागांचा वीजपुरवठा मंगळवारी सकाळी १० ते दुपारी ४ ...

Seven hours of power outages in most parts of Dombivli | डोंबिवलीत बहुतांशी भागांत सात तास वीज खंडित

डोंबिवलीत बहुतांशी भागांत सात तास वीज खंडित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : पावसा‌ळ्यापूर्वीची कामे, तसेच देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवलीतील काही भागांचा वीजपुरवठा मंगळवारी सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान, तर काही भागांत ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. त्यात प्रमुख्याने जोशी हायस्कूलजवळील तीन ट्रान्सफॉर्मर व त्यावरील उच्च व लघुदाब वाहिन्या नजीकच्या भागात स्थलांतरित करण्यात आल्या.

बाजीप्रभू उपकेंद्रांतर्गत कोपर रोड, शास्त्रीनगर, जुनी डोंबिवली, तर ठाकुर्ली, पी. व्ही. रोड, छेडा रोड, पेंडसेनगर, ९० फूट रोड, चोळेगाव, हनुमान मंदिर परिसर, ठाकुर्ली रेल्वेस्थानक, विवेकानंद सोसायटी, पंचायत बावडी, नेहरू रोड, फडके रोड, फते अली रोड, गणेश मंदिर व परिसर, सावरकर रोड आदी ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तेथे वृक्षाच्या फांद्या छाटणे, वेली दूर करणे, दुरुस्ती, नटबोल्ट बदलणे, जीओडी मेंटेनन्स आदी कामे करण्यात आली. दरम्यान, जोशी शाळेच्या परिसरातील वीजपुरवठा सायंकाळी ६ पर्यंत पूर्ववत झालेला नव्हता.

त्याचबरोबर गरिबाचा पाडा फिडरवरील महाराष्ट्रनगर, सरोवरनगर, सह्याद्रीनगर, मल्हारनगर, श्रीधर म्हात्रे चौक, तसेच काळूनगर फिडरवरील ठाकूरवाडी, काळूनगर, आनंदनगर व सम्राटनगरच्या काही भागांचा वीजपुरवठा खंडित करून दुरुस्तीची कामे केल्याचे जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दुधभाते यांनी सांगितले.

--

Web Title: Seven hours of power outages in most parts of Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.