शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

कसाऱ्यात सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 12:41 AM

अंमलबजावणीला सुरुवात : साखळी तोडण्यासाठी व्यापारी, नागरिकांचा प्रतिसाद 

लोकमत न्यूज नेटवर्क कसारा : राज्य सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत आठवड्यातून दोन दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, दोन दिवसांच्या बंदमुळे कोविड रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने कसारा ग्रामपंचायत, पोलीस, आरोग्य सेवा या स्थानिक प्रशासनाने कसारा व परिसरातील वाढती  कोरोना  रुग्णसंख्या लक्षात घेता कसाऱ्यात स्वयंस्फूर्तीने सात दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. रविवारपासून सुरू झालेल्या या कर्फ्यूला व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. रविवारी सकाळपासूनच कसारा बाजारपेठ परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. अत्यावश्यक सेवेतील सर्वांनी बंदमध्ये सहभाग दाखवून प्रशासनास  सहकार्य केले.  बंद दरम्यान ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, शहापूर उपविभागीय पोलीस अधीक्षक नवनाथ ढवळे   यांच्या मार्गदर्शनाखाली    कसारा  पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  के. ए. नाईक, गणेश माळी यांनी  चोख बंदोबस्त ठेवत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. 

कसारा परिसरात अनेक कोरोना रुग्ण आहेत. काही रुग्ण बाजारपेठेत बिनधास्त फिरत आहेत. शिवाय रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी विनाकारण फिरणाऱ्यांवर  कारवाई व्हावी  तसेच कोरोना संक्रमणाची चेन तुटावी यासाठी सात दिवसांचे कडक लॉकडाऊन आम्ही जाहीर केले आहे.  - प्रियंका जाधव, सरपंच, मोखवणे  

जनहितार्थ  स्थानिक प्रशासनाने घेतलेला निर्णय कोरोनाची साखळी तोडू शकेल. या जनता कर्फ्यू दरम्यान जर कोणी विनाकारण फिरताना, विनामास्क फिरताना आढळल्यास, जमाव करून फिरत असल्यास  अशा लोकांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.- गणेश माळी, सहायक पोलीस निरीक्षक, कसारा

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने कोअर कमिटी तयार करून जनहितार्थ घेतलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील कोविड रुग्ण साखळी तोडण्यास मदत होईल व प्रशासनास योग्य ते सहकार्य होईल. - नीलिमा सूर्यवंशी, तहसीलदार