शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन; वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 6, 2025 20:17 IST

विषयाचा व्यासंग, सखोल चिंतन, स्पष्ट भूमिका आणि परखड विवेचन ही त्याच्या लिखाणाची आणि वक्तृत्वाची वैशिष्ट्ये आहेत

ठाणे - ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे आज शुक्रवार  ६ जून रोजी संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

रामायण, महाभारताचे व्यासंगी, संतवाङ्मयाचे अभ्यासक, असलेल्या दाजींनी ५० वर्षाहून अधिक काळ आपल्या व्याख्याने आणि साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले. आजोबा वासुदेवशास्त्री पणशीकर यांचा हिंदू धर्मग्रंथ, परंपरा यांचा वारसा त्यांनी पुढे नेला. देशविदेशात सुमारे अडीच हजार व्याख्याने दिली. सोबत, दोन वृत्तपत्रातील लेखमालांबरोबरच एका दैनिकात सलग १६ वर्षे त्यांनी लिहिलेल्या विविध लेखमाला हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा वैचारिक ठेवा आहे. महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता?, कथामृतम, कणिकनिती, शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित स्तोत्र गंगा (दोन भाग), अपरिचित रामायण (पाच भाग), गानसरस्वती किशोरी आमोणकर - आदिशक्तीचा धन्योद्गार अशा त्यांच्या विविध ग्रंथांच्या आजवर ३० हून अधिक आवृत्या निघाल्या आहेत.

विषयाचा व्यासंग, सखोल चिंतन, स्पष्ट भूमिका आणि परखड विवेचन ही त्याच्या लिखाणाची आणि वक्तृत्वाची वैशिष्ट्ये आहेत. मोठे बंधू प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा  नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक म्हणून दाजींचा मराठी साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट, क्षेत्रातल्या दिग्गज कलाकारांशी जवळून संबंध आला. महाराष्ट्राचा गेल्या ५० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास ज्ञात असलेले एक व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. अंतिम संस्कार शनिवारी ७ रोजी सकाळी साडेनऊ वाजता जवाहर बाग स्मशानभूमी,  ठाणे पश्चिम येथे होणार आहेत.