शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक भवनाचा ताबा नाहीच

By admin | Updated: January 24, 2017 05:43 IST

मागील महापालिका निवडणुकीपूर्वी ठाणे महापालिकेने ‘ज्येष्ठ नागरिक भवन’ उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, या भवनाचा ताबा

स्नेहा पावसकर / ठाणेमागील महापालिका निवडणुकीपूर्वी ठाणे महापालिकेने ‘ज्येष्ठ नागरिक भवन’ उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, या भवनाचा ताबा वारंवार पाठपुरावा करूनही ज्येष्ठ नागरिकांना दिला नाही. आता निवडणुका आल्यावर तरी या निर्णयाची अंमलबजावणी होणार किंवा कसे, असा सवाल ज्येष्ठ नागरिक करीत आहेत. ठाण्यात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने असून शहरात सुमारे २५ ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. त्या सर्वांची मिळून ज्येष्ठ नागरिक संघ, मध्यवर्ती समिती कार्यरत आहे. या समितीच्या माध्यमातून शहरातील ज्येष्ठांसाठी विविध सोयीसुविधा राबवण्यात येतात. ज्येष्ठांच्या सोयीसाठी आणि समितीच्या कामासाठी महापालिकेने मागील निवडणुकीपूर्वी गजानन चौक परिसरातील ‘वारकरी भवन’ इमारतीचा पहिला मजला ‘ज्येष्ठ नागरिक भवन’ला दिला. त्यावेळी आमदार एकनाथ शिंदे यांनीही एका बैठकीदरम्यान ज्येष्ठांकडून नाममात्र म्हणजे अगदी एक रुपया भाडे घेऊन भवनाची जागा द्यावी, असे सुचवले होते. मात्र, त्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून आलेल्या पत्रात या जागेसाठी वर्षाला ७ लाख रुपये भाडे आकारले जाईल, असे सांगितले. अनेक ज्येष्ठ नागरिक हे निवृत्त असतात. तसेच ही समिती ज्येष्ठांच्या सोयीसाठी कार्यरत असून तिला उत्पन्नाचे काही साधन नाही. त्यामुळे इतके मोठे शुल्क भरणे अशक्य असल्याने ते कमी करण्याची विनंती केली होती. अनेकदा पाठपुरावा करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसून अद्यापही जागेचा ताबा मिळालेला नाही. ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी पोलिसांबरोबरच समितीही वेगळा उपक्रम राबवण्याच्या विचारात आहे. तसेच ज्येष्ठांच्या विविध आजारांवर मात करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवायलाही जागा नसल्याने त्यांना सुविधा देता येत नाही. त्यामुळे आमच्यासाठीच अलॉट केलेली भवनाची जागा देऊन आम्हाला आधार मिळावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. आता यावर काय कार्यवाही होते ते पहायचे. (प्रतिनिधी)