शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बालेकिल्ल्यातच सेनेला बंडखोरीची लागण

By admin | Updated: January 13, 2017 06:46 IST

चार प्रभागांचा एक प्रभाग झाल्याने प्रस्थापितांनी प्रत्येकी दोन जागांची मागणी लावून धरली आहे. त्यातच बालेकिल्ला

उल्हासनगर : चार प्रभागांचा एक प्रभाग झाल्याने प्रस्थापितांनी प्रत्येकी दोन जागांची मागणी लावून धरली आहे. त्यातच बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या परिसरात शिवसेनेतील इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षापुढे बंडखोरीची भीती आहे. उमेदवारीच्या वाढत्या मागणीमुळे जिल्हास्तरीय नेते त्रस्त झाले आहेत. मराठा सेक्शन, गायकवाडपाडा, संतोषनगर, शहाड गावठाण परिसरात बंडखोरीने डोके वर काढले आहे. हे बंडोबा वेळीच थंड झाले नाहीत, तर बालेकिल्ल्याला भगदाड पडण्याची भीती आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत दरवेळी सिंधी-मराठी वाद उफाळून येतो. मराठी भाषक परिसरातून बहुतांश शिवसेना, मनसे, रिपाइंचे नगरसेवक; तर सिंधी परिसरातून भाजपासह साई व काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक निवडून येतात. साई व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही मराठी परिसरात पाय पसरल्याने शिवसेना-रिपाइंच्या उमेदवारांना धोका निर्माण झाला; तर शिवसेना व रिपाइंचा एकही नगरसेवक सिंधीबहुल परिसरातून निवडून आला नाही. विठ्ठलवाडी-शांतीनगर परिसर, संतोषनगर-महादेवनगर, मराठा सेक्शन, शहाड गावठण परिसर, कैलास कॉलनी-गायकवाड पाडा, संभाजी चौक परिसर, सी ब्लॉक परिसर हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. त्या बालेकिल्ल्यातच इतर पक्षांनी हातपाय पसरल्याने आधीच शिवसेनेपुढे धोका निर्माण झाला आहे. त्यात पक्षातील इच्छुक वाढल्याने आधी ढासळता पाया आणि त्यात बंडाची भीती असा दुहेरी तिढा शिवसेनेपुढे आहे. कॅम्प नं-४ मराठा सेक्शन या शिवसेना बालेकिल्ल्यातून जयश्री कांबळी, सुभाष मनसुलकर, सुरेश जाधव व शिवसेना पुरस्कृत नगरसेवक सुनील सुर्वे निवडून आले. मात्र इच्छुकांच्या संख्येत वाढ झाल्याने पक्षासमोर पेचप्रसंग उभा ठाकला आहे. तिच परिस्थिती प्रभाग क्रमांक २० मध्ये आहे. येथून महापौरपदी असलेल्या अपेक्षा पाटील, प्रधान पाटील, समीधा कोरडे, जयेंद्र मोर निवडून आले. यावेळी प्रभाग तीन सदस्यीय झाला असून त्यापैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला. त्यामुळे सध्याच्या चौघांपैकी दोघांनाच पक्षाचे तिकिट मिळणार असून पाटील कुटुंबांनी प्रभागावर हक्क सांगितला आहे. सुमिधा कोरडे, जयेंद्र मोरे यांच्यासह माजी नगरसेवक कैलास तेजी यांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली असून त्यातून बंडखोरीची शक्यता व्यक्त होत आहे. संतोषनगर, महादेवनगर परिसरातून शिवसेनेचे धनजंय बोडारे, वसुधा बोडारे, लीलाबाई आशान निवडून आले आहेत. विठ्ठलवाडी, शांतीनगर प्रभागातून माजी महापौर राजश्री चौधरी, विजय सुफाळे निवडून आले असून राष्ट्रवादीच्या नगरसेविका बहेनवाल यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. प्रभागावर एकहाती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांचे वर्चस्व असल्याने बंडखोरी नाही. मात्र शहाड गावठाण, संभाजी चौक-लालचक्की परिसरासह सी ब्लॉक या शिवसेना बालेकिल्यात बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)प्रस्थापितांचा हट्ट कायम शिवसेना बालेकिल्यात इच्छुक उमेदवाराच्या वाढत्या संख्येने बंडखोरीने डोके वर काढले असतानाच प्रस्थापित नगरसेवकांची दोन तिकिटांची मागणी कायम आहे. बंडखोरांपेक्षा प्रस्थापित नेते व नगरसेवक हेच पक्षाला घातक ठरत असल्याचे बोलले जाते. च्त्यांना तिकिट नाकारून होतकरू व कट्टर शिवसैनिकाला पक्षाचे तिकिट देण्याची मागणी होते आहे. मात्र ते शक्य नाही. गेल्या दहा वर्षांच्या सत्ता काळात एकही योजना पूर्ण करू शकले नसल्याचा ठपकाही सेनेवर असल्याने मराठीजनांत नाराजी आहे.