मतिमंद वृद्धेवर अत्याचार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, न्यायालयाचा आदेश

By जितेंद्र कालेकर | Updated: February 12, 2025 23:01 IST2025-02-12T23:01:05+5:302025-02-12T23:01:23+5:30

दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षाही आराेपीला भाेगावी लागणार आहे.

Security guard sentenced to ten years in rigorous imprisonment for abusing mentally retarded elderly woman | मतिमंद वृद्धेवर अत्याचार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, न्यायालयाचा आदेश

मतिमंद वृद्धेवर अत्याचार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, न्यायालयाचा आदेश


ठाणे: एका ६५ वर्षीय मतिमंद वृद्धेवर पाणी मागण्याच्या बहाण्याने बलात्कार करणाऱ्या आराेपी माेहम्मद गुड्डू उर्फ दिलकाश शेख (४०) या सुरक्षा रक्षकाला दहा वर्षे सश्रम कारावासाची आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने बुधवारी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षाही आराेपीला भाेगावी लागणार आहे.

ठाण्यातील नाैपाडा भागात राहणारी ही वृद्ध महिला ३ नाेव्हेंबर २०२१ राेजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरात एकटीच हाेती. त्यावेळी ती वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने तिच्याकडे पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरकाव केला. त्यानंतर त्याने बळाचा वापर करीति तिच्यावर बलात्कार केला हाेता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नाैपाडा पाेलीस ठाण्यात विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला हाेता.

मुळच्या बिहार राज्यातील या आराेपीला तत्कालीन सहायक पाेलीस निरीक्षक एम. पी. साेनवणे यांच्या पथकाने ४ नाेव्हेंबर २०२१ राेजी अटक केली हाेती. याच खटल्याची सुनावणी ठाण्याचे विशेष पाेस्काे न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात १२ फेब्रुवारी २०२५ राेजी झाली. आराेपीला शिक्षा मिळण्यासाठी सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी सर्व साक्षी पुरावे सादर करुन जाेरदार बाजू मांडली. पाेलीस हवालदार सुशांत शेलार यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. सर्व बाजू पडताळल्यानंतर आराेपीला न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Web Title: Security guard sentenced to ten years in rigorous imprisonment for abusing mentally retarded elderly woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.