ठाण्यातील १४० रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 23:36 IST2021-01-10T23:35:36+5:302021-01-10T23:36:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भंडारा जिल्यात झालेला प्रकार अत्यंत खेदजनक असून असून राज्यात अशी अनेक रु ग्णालये सुरू ...

Security of 140 hospitals in Thane on the rise again | ठाण्यातील १४० रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ठाणे अग्निशमन दलही करणार कारवाई

ठळक मुद्देभंडारा दुर्घटना : ठाणे अग्निशमन दलही करणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: भंडारा जिल्यात झालेला प्रकार अत्यंत खेदजनक असून असून राज्यात अशी अनेक
रु ग्णालये सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यारखी पुनरावृत्ती ठाण्यातही होण्याची भीती व्यक्त होत आहे. ठाण्यातील तब्बल १४० खासगीरु ग्णालयांकडे फायर एनओसी नसल्याचे वास्तव समोर आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये अग्निशमन दलाकडून पुन्हा अशा रुग्णालयांचा आढावा घेतला जाणार असून त्यांना कारवाईची नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
ठाण्यातील खासगी रु ग्णालयांना फायर एनओसी नसल्यामुळे अशी नामांकित १४० रु ग्णालये ४८ तासांची नोटीस देऊन सील करण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाला न्यायालयाने दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे ही सर्व रु ग्णालये आजही सुरु आहेत. काही महिन्यांपूर्वी याबाबत काही कार्यकर्त्यांनी अग्निशमन अधिकारी आणि महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली असता तीन रु ग्णालये सील केली. मात्र, काही तासात ती पुन्हा खुली करण्यात आली. दरम्यान, या संदर्भात पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरु डकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
ठाणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यासंदर्भात म्हणाले, २०१९ मध्ये न्यायालयाच्या आदेशाने अग्निसुरक्षेचे नियम न पाळणाºया रुग्णालयांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. यातील काही रुग्णालयांनी अटी शर्थींचे पालन केल्यामुळे त्यांना हे फायर एनओसी देण्यात आले आहे. परंतू, यातील किती जणांनी घेतले आणि किती बाकी आहेत? याचा आढावा घेतला नसल्याचीही त्यांनी कबूली दिली. तो आढावा लवकरच घेण्यात येणार असून उर्वरित रुग्णालयांना पुन्हा नोटीस बजावाली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
* जिल्हा रु ग्णालयाची सुरक्षा यंत्रणा भक्कम
ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय आणि ठाणे महानगर पालिकेचे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणा सक्षम आणि पुरेशा असल्याचा दावा या रुग्णालयांनी केला आहे.
जिल्हा रु ग्णालयाची आगरोधक सुरक्षा यंत्रणा भक्कम असून तिची वेळेवर दुरु स्ती आणि लेखापरीक्षण केले जाते. रु ग्णालयातील सर्व सिलिंडरचे फेब्रुवारी महिन्यात रिफिल केले आहेत. या रु ग्णालयात अशी दुर्दैवी घटना घडू नये, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. सध्या जिल्हा रु ग्णलयात कोविड रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सध्या येथे उपचार केले जातात. या रुग्णालयात बालकांसाठी १६ खाटांची सुविधा असल्याचे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.

Web Title: Security of 140 hospitals in Thane on the rise again