ठाण्यामध्ये भंगार साहित्याच्या गाळ्याला आग; दुचाकीही पेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 10:02 IST2022-03-01T10:00:14+5:302022-03-01T10:02:50+5:30

Fire in Thane : आगीत भंगार साहित्यासह पार्क केलेल्या दुचाकीचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.

Scrap Shop fire in Thane; The bike also caught fire | ठाण्यामध्ये भंगार साहित्याच्या गाळ्याला आग; दुचाकीही पेटली

ठाण्यामध्ये भंगार साहित्याच्या गाळ्याला आग; दुचाकीही पेटली

ठाणे - भंगार साहित्य असलेल्या गाळ्याला लागलेल्या आगीत दुचाकीने पेट घेतल्याची घटना मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमार कोपरी गाव, श्री साई बाबा सोसायटीच्या बाजूला, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे चेकनाका जवळ, घडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसून आगीवर ही तातडीने नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.

हरी भोईर यांच्या गाळ्याला लागल्याची माहिती मिळताच, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत  तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे आग काही मिनिटांत आटोक्यात आली. मात्र आगीत भंगार साहित्यासह पार्क केलेल्या दुचाकीचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.


 

Web Title: Scrap Shop fire in Thane; The bike also caught fire