शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

जिल्ह्यावर टंचाईची कु-हाड, २२ टक्के पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 3:15 AM

अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २२ टक्के पाणीकपातीस २२ आॅक्टोबर अर्थात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे.

ठाणे : ठाणे शहराचा काही भाग, घोडबंदरसह जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २२ टक्के पाणीकपातीस २२ आॅक्टोबर अर्थात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. आता सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा एक दिवस पूर्ण बंद ठेवण्याची सक्ती आता लागू झाली आहे.बारवी धरणासह उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणाºया पाणीपुरवठ्यात २२ टक्के तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून २२ टक्के पाणीकपातीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने घेतला. एमआयडीसी, केडीएमसी, स्टेम आणि एमजेपी आदींद्वारे ठिकठिकाणच्या शहरांना रोज सुमारे एक हजार १९२ एमएलडी पाणीपुरवठा होतो. त्यातून आठवड्याभरात २२ टक्के पाणीबचत करायची आहे. यामुळे महापालिकांनी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.>यंदा महिनाआधीच पाणीकपातजिल्ह्यात सक्तीने लागू केलेली २२ टक्के पाणीकपात आगामी दिवाळी, ईद आदी सणासुदीच्या काळात मात्र रद्द करण्यात येणार आहे. यामुळे सणवाराच्या कालावधीत मात्र मनसोक्त नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. धरणातील पाण्यातील तूट लक्षात घेऊनगेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल एक महिना आधी ही सक्तीची पाणीकपात लागू करावी लागली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून ती १४ टक्के लागू केली होती. मात्र, नंतर फेब्रुवारी, मार्चला ती ७ टक्के केली होती. त्यानंतर ती रद्द केली होती. आता धरणातील कमी साठा लक्षात घेऊन लघूपाटबंधारे विभागाने सक्तीची २२ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार महापालिकांसह एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदींना तो सक्तीने पाळावा लागणार आहे.>अशी होईल दिवसनिहाय कपातसोमवारपासून ही सक्तीची पाणी कपात लागू झाली आहे. यानुसार बारवी धरणासह उल्हास नदीतून पाणी उचलणाºया एमआयडीसीचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील कारखाने, कंपन्यांसह उल्हासनगर मनपा आदी ठिकाणी होणारा पाणीपुरवठा आता शुक्रवारी या एक दिवसाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यामुळे एमआयडीसीकडून सुमारे ५८३ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची बचत होणार आहे. कल्याण - डोंबिवलीचा २३४ एलएलडी पाणीपुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येईल. तर स्टेमद्वारे उचलण्यात येणारा २८५ एमएलडी पाणीपुरवठा बुधवारी बंद ठेवण्यात येईल. यामुळे ठाणेच्या काही भागांसह भिवंडी मनपासह मीरा-भार्इंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील गावखे्यांचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहील. अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सोमवारी पुरवठा बंद ठेवणार आहे. यामुळे ९० एमएलडी पाणीबचत एमजेपीकडून बचत होणार आहे. या पाणीकपातीमुळे बचत होणारे धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी