सरिता खानचंदानी आत्महत्या प्रकरणी; उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:23 IST2025-09-05T15:23:01+5:302025-09-05T15:23:15+5:30
सुसाईड नोट्सवरून गुन्हा.... पोलीस उपायुक्त सचिन गोरे

सरिता खानचंदानी आत्महत्या प्रकरणी; उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल
सदानंद नाईक
उल्हासनगर : पर्यावरणवादी सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोट्सवरून उद्धवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांच्यासह ५ जणावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. सरिता यांचे पती पुरुषोत्तम खानचंदानी यांनी स्थानिक पोलीसावरही संशय व्यक्त केल्याने, पोलीस कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले.
उल्हासनगरातील पर्यावरणवादी सरिता खानचंदानी यांनी गेल्या ६ वर्षापासून मदतीचा हात देणाऱ्या जिया गोकलानी या महिले सोबत रात्री वाद झाले. जिया हिच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सरिता खानचंदानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकाराचा जाब विचारण्यासाठी दुसऱ्या दिवसी सकाळी सरिता खानचंदानी ह्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. पोलीस अधिकाऱ्या सोबत चर्चा झाल्यानंतर, अर्धा तासांनी पोलीस ठाण्याच्या शेजारील त्यांच्या ऑफिसच्या समोरील इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. त्यांचे पती पुरुषोत्तम खानचंदानी यांनी आत्महत्येला जिया गोखलांनी, उल्हास फाळके, विठ्ठळवाडी पोलीसासह उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांना जबाबदार धरले होते.
आत्महत्येच्या दुसऱ्या दिवसी पुरुषोत्तम खानचंदानी यांनी त्यांच्या ऑफिसचे सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता, सरिता यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ११. २५ वाजता एका डायरी मध्ये काहीतरी लिहताना दिसल्या. त्यांनी तपास घेतला असता, सरिता हिने डायरी मध्ये इंग्रजी भाषेत सुसाईड नोट्स लिहून त्यांच्या आत्महत्येला जिया गोपलानी, उल्हास फाळके, धनंजय बोडारे, शिवानी शुक्ला, ॲड. राज चंदवानी हे जबाबदार आहेत. असे म्हटले. मी काहीही चुकीचे केले नाही. मी कोणचाही पैसा घेतला नाही. मी जिया गोपलानीवर कोणताही अन्याय केला नाही. मी कोणत्याही मंडळाकडून, कोणत्याही नेत्याकडून एक रुपयाही घेतला नाही. जिया गोपलानी आणि उल्हास फाळके मला खोट्या आरोपांमध्ये अडकवत आहेत. ह्या लोकांनी मला मानसिक त्रास देऊन या स्तरावर आणले आहे. की मला माझे जीवन संपवावे लागले. असे लिहले आहे.
सुसाईड नोट्सवरून गुन्हा.... पोलीस उपायुक्त सचिन गोरे
सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्यानंतर त्यांची सुसाईड नोट्स पोलिसांना मिळाली. त्यामध्ये पाच जणांची नावे असून त्यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आजपर्यंत कोणालाही अटक केली नाही. उद्धवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांच्यावर गुन्हा दाखल आल्यानंतर, ते नॉटरिचेबल झाले.